नागपूर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा दावा खोडून काढला आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची हत्या आर्थिक व्यवहारातून झाली, त्यामागे जातीय कारण नव्हते, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. मात्र, सुरेश धस (Suresh Dhas) यांनी हा दावा खोडून काढला. संतोष देशमुखची हत्या ही आर्थिक देवाणघेवाणीतून झाली नव्हती हे मी सांगतो, मी पण जिल्ह्यातच राहातो, असे वक्तव्य करत धस यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ते मंगळवारी नागपूरमध्ये विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संतोष देशमुख या तरुण सरपंचाची हत्या झाली. त्याचे फरार आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी सांगितलंय मारेकरी मोबाइल आणि गाडी बार्शीजवळ सोडून पळून गेलेत. मारहाण करत असताना व्हीडिओ रेकॉर्ड करत दाखवला आहे. त्याला देखील 302 चा आरोपी केले पाहिजे. मारहाणीनंतर संतोष देशमुखला पाणीदेखील दिले नाही, दोन तास त्यांना मारहाण केली. मी एसआयटी नियुक्तीसंदर्भात पत्र दिले आहे. आधी सीआयडी चौकशीची नियुक्ती झाली आहे. सीआयडीला नावं ठेवत नाही, मात्र घटनेचा तपास लोकल पोलिसांकडे ठेवावा यासाठी मागणी केली. आज किंवा उद्या एसआयटी गठीत होईल, त्यानंतर ॲक्शन होईल. विमा कंपन्याबाबत काही प्रकार होतात, त्यात डाटाचा वापर करतात. यांचे कोणाला कुठे कॉल झाले, काही ट्रॅन्झॅक्शन झालेत का? संतोष देशमुख सरपंच तिसऱ्यांदा झाला होता, लवकरात लवकर आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
ज्यांनी संतोष देशमुखचा मुडदा पाडला त्यांचा आका शोधला पाहिजे. पोलिसांवर कोणी दबाव टाकेल असं वाटत त्यांचे शागीर्द आहे त्यांचे नाव शोधावे नाही, ना टाकू शकेल, मात्र दिरंगाई होता कामा नये. मारेकऱ्यांचे शागीर्द कोण, हे शोधले पाहिजे, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
परळीतील दहशतवादाचा निपटारा करावा लागेल: अंबादास दानवे
यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाबाबत भाष्य केले. बीड परळीतील दहशतवाद निपटून काढावा लागेल. एखादा पालकमंत्री बीडला पाठवायला हवं आणि कायदा सुव्यवस्था नीट केली पाहिजे. वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा का दाखल झाला ? खंडणीचा गुन्हा आहे. स्थानिक नेत्यांमुळे थोडी हे होऊ शकतं. मतदान केंद्रावर लोकांना जाऊ दिलं नव्हते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.
आणखी वाचा
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?