Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण मंत्रि‍पदाची जबाबदारी दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्रि‍पद (School Education Minister) मिळताच त्यांनी नाशिकमध्ये विविध शाळांना भेटीगाठी दिल्या आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या हिवाळी शाळेला भेट देऊन दादा भुसे देखील अवाक झाल्याचे दिसून आले. 


नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलपासून 40 किलोमीटर अंतरावर हिवाळी नावाचे गाव आहे. या हिवाळी गावाच्या शाळेने सुविधांची वाणवा असताना देखील जिल्ह्यात आदर्श निर्माण केलाय. ही शाळा 365 दिवस भरते. विद्यार्थ्यांना दररोज सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत या शाळेत शिक्षण दिलं जातं. या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना तब्बल 400 पेक्षा अधिक पाढे तोंडपाठ असून भारतीय संविधानातील सगळीच कलम पाठ आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग, जगभरातील देशांच्या राजधान्या हे देखील या शाळेतील विद्यार्थी पुस्तक न पाहता सांगतात. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विचारण्यात येणारी गणिते आणि तार्किक प्रश्नांची उत्तरेही हे विद्यार्थी अचूक देतात. विशेष म्हणजे ही मुले दोन्ही हाताने लिहितात. 


मंत्री दादा भुसेही झाले अवाक 


त्यामुळे या शाळेला भेट देऊन त्यांची कार्यपद्धती जाणून घेत ती राज्यभर कशी उपयोगाला येऊ शकेल, यावर विचारविनिमय करण्यासाठी दादा भुसे यांनी या शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांचे टॅलेंट पाहून दादा भुसे देखील अवाक झाले. यावेळी शिक्षण प्रणालीमध्ये धोरण ठरवताना त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी चांगले कार्य करणाऱ्या शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या संस्थांची पाहणी करून, संवाद साधून, वास्तविकतेवर आधारित राज्यव्यापी धोरण ठरवण्याचा मनोदय असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले. 


केशव गावित यांच्या अभिनव प्रयत्नाला यश


दरम्यान, केशव गावित यांच्या अभिनव प्रयत्नातून या शाळेला बहुतांश यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर आपला भर असल्याचे शिक्षक केशव गावित यांनी सांगितले आहे. येथील विद्यार्थी विविध कलागुणांमध्ये पारंगत आहेत. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चकीत करणारी आहे. हिवाळी शाळेत प्रवेश करताच सर्व भिंती वारली पेंटिंगने तसेच विविध नद्या, फळे, गावांची नावे याने रंगवल्याचे नजरेस पडते. बालवाडीच्या वर्गांमध्ये खेळणी, शाळेत डिजिटल रूम, वाचनालय यासोबतच सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी प्रोजेक्ट रूमही येथे तयार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI