Sanjay Shirsat: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची माळ संजय शिरसाटांच्या गळ्यात पडली आहे. मातोश्री वरून संजय शिरसाठ यांना पाडा असा आदेश आला. कपटकारस्थान करणाऱ्या माणसाने व्हॉइस चॅट शिंदेंना दाखवत मला मंत्री कसे करू नये असे प्रयत्न झाले. मंत्रीपदाची शपथ घेताना हात लटपट कापत होते. मी मंत्री झालो हे काही जणांच्या पोटात दुखत होते. निवडणुकीच्या काळात मी टेन्शन घेत नाही पण करेक्ट कार्यक्रम करतो .या निवडणुकीत पैसे जास्त लागले पण मीही मोकळा हात केला . एक वेळ होती दोन दोन दिवस उपाशी असायचो आता खायला वेळ नाही .मी पाचही वर्ष पालकमंत्री राहणार असल्याचं सांगत एकनाथ शिंदे जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा चिंतेची गरज नाही, असं शिरसाठ म्हणाले . पालकमंत्री पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी सोमवारी शिंदे सेनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. कसली गुरमी आणि मस्ती आहे पालकमंत्री काय असतो ते दाखवतो . आमच्या नादाला लागू नका असं म्हणत मंत्री शिरसाठ यांनी सत्तारांवर जोरदार टीका केली .
काय म्हणाले संजय शिरसाट ?
आज पालकमंत्री म्हणून काय बोलावे सुचत नाही. पालकमंत्री पद हे स्वप्न वाटत आहे . मी निवडणुकीत टेन्शन घेत नाही पण करेक्ट कार्यक्रम करतो .काही लोकांनी मला पाठीमागून मदत केली आहे .आम्हाला बंड केल्यावर गद्दार 50 खोके असे टीका झाली .लोक म्हणायचे आता हे निवडून येत नाहीत . संजय नाव आहे माझे मला दूरचे कळते . त्यांचा जन्म झाला नाही तेव्हापासून मी काम करतो .मातोश्रीमधून मला जबाबदार माणसाचा फोन आला आणि मला विचारले आमच्या पक्षाचा उमेदवार कोण आहे .आमच्या माणसांना ज्याचं नाव घेतलं ते पडतात असं म्हणत शिरसाटानी अंबादास दानवेंवर टीका केली . 22 तारखेला प्रवेश घेऊन शिवसेना काय करते ते दाखवतो .सिल्वर ओक वर तुम्हाला का जावे लागते . कोण आहेत तुमचे ते .अजूनही लाचारी संपत नाही . अडीच वर्ष मी पक्षाची खिंड लढवली शिंदे साहेबांनी मला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला .मातोश्री वरून आदेश आला संजय शिरसाठ यांना पाडा . कपटकारस्थान करणाऱ्या माणसाने व्हॉइस चॅट शिंदेंना दाखवत मला मंत्री कसे करू नये असा प्रयत्न केला . एकनाथ शिंदे जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा चिंता करायची गरज नाही .मंत्री होणाऱ्या यासाठी मला फोन आला पण भीती वाटत होती .मंत्री पदाची शपथ घेताना हात पाय लटपट कापत होते .शपथ घेताना माझ्या बाजूला प्रताप सरनाईक होते. ते म्हणाले, करोडोंच्या संपत्तीपेक्षा हा दिवस महत्त्वाचा .
रिक्षावाल्याचे दिवस बदलले .मी शपथ घेताना जल्लोष झाला आणि शिंदे साहेबांना वाटले हे माणसाला कुठून .निमंत्रित झालो तर काही जणांच्या पोटात दुखत होते .तुम्ही कितीही मिळावे घ्या वाढदिवस साजरे करा .आमच्या नादाला लागले तर सोडणार नाही आमचा शिवसैनिक अजून जिता आहे . कसली गुरमी आणि मस्ती आहे पालकमंत्री काय असतो ते दाखवतो . आमच्या नादाला लागू नका असं म्हणत मंत्री शिरसाठ यांनी सत्तारांवर जोरदार टीका केली .
जो करेंगा ठोक के करेंगा
या निवडणुकीत पैसे जास्त लागले पण मीही हात मोकळा केला . एक वेळ होती दोन-दोन दिवस उपाशी राहायचो.आता खायला वेळ नाही . राज्याचे काम जिल्ह्यातून करू .बाळासाहेब ठाकरे म्हणायचे माझ्या शिवसैनिक माझे कवच कुंडल आहेत . शहरात दादागिरीचे जे वारे सुरू आहेत ते संपवायचे आहेत . या शहराला लागलेली कीड आपण संपवलेली आहे आणि दुसरी संपवायची आहे .असं म्हणत शिरसाठानी इम्तियाज जलील यांच्यासह अब्दुल सत्तारांवरही कडवी टीका केली .या शहरात एक धाक असला पाहिजे .गुंड बनून तुम्ही समाजसेवक वावरत असाल तर ते मी संपवणार .काल मी काय कामगार होतो आज मी पालकमंत्री झालो .संजय शिरसाठ कोणाच्या बापाला घाबरत नाही जो करेंगा ठोक के करेंगाअसं शिरसाट म्हणाले .