Supriya Sule Reaction on Sanjay Raut Ed Raid : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज सकाळपासून ईडी (ED) चौकशी सुरु आहे. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  संजय राऊत ईडी चौकशीला सहकार्य करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, 'जेव्हा कोणतीही तपास यंत्रणा आपल्या घरी चौकशीसाठी येते. तपास यंत्रणेला सहकार्य करणं आपली नैतिक जबाबदारी आहे. संजय राऊत ईडी चौकशीला सहकार्य करतील, असा विश्वास आहे.'


केंद्रीय तपास यंत्रणाचा  गैरवापर


राऊतांच्या ईडी चौकशीमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवेळी काँग्रेसही आक्रमक झाली होती. केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत विरोधकांना दाबण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे. केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येत आहे. संजय राऊतांच्या समर्थनार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे.


'कुणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकारनं घ्यावी'


ईडीचा मुद्दा संसदेत उपस्थित करु असं, सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की. 'ईडी कारवाईच्या घटना सातत्याने घडत आहेत. काँग्रेससोबतही असंच घडलं. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा आम्ही संसदेतही मांडला याआधीही मांडला आहे आणि आता पुन्हा मांडू. कुणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकारनं घ्यावी. तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचं काम आम्ही करु. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही वेळोवेळी तपास यंत्रणांना सहकार्य केलं आहे.'


'याआधी विरोधक हा फक्त विचारांचा विरोधक होता'


दरम्यान, राऊतांवरील ईडी कारवाईनंतर शिवसेना विरोधकांकडून अर्थात शिंदे गट आणि भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहेत. संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईने आनंद झाल्याची प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, 'हे खूप दुर्देवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी विरोधक हा फक्त विचारांचा विरोधक होता, कधीही कुणीही एकामेकांवर वैयक्तिक टीका केली नाही, मात्र सध्या विरोधक वैयक्तिक टीका करतात हे चुकीचं आहे.'


महत्त्वाच्या इतर बातम्या