Shivsena Sanjay Raut :शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल (ED Raids On Sanjay Raut) झाले आहेत.  पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीकडून चौकशी आणि छापेमारी सुरू असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट केले आहे. आपण शिवसेना सोडणार नाही, असे ट्वीट संजय राऊत यांनी केली आहे. खोटे प्रकरण आणि खोटी कारवाई सुरू असून मरेन पण शरण जाणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. 



संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याची माहिती आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीचे पथक संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी दाखल झाले. त्यानंतर तासाभरानंतर संजय राऊत यांनी तीन ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 


 














 







 
संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाल्याचे समजताच विभागातील शिवसैनिकांनी राऊतांच्या घराबाहेर जमण्यास सुरुवात केली. काही शिवसैनिकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. परिसरात सध्या तणावाची स्थिती आहे. ईडीने याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स बजावले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली असल्याची माहिती आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती आहे. 


नेमकं काय पत्राचाळ प्रकरण?


पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.


प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.