मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राच्या राजकारणातील आनंदीबाई आणि पक्ष फोडणारा खलनायक, असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. जनतेने फडणवीसांना जबाबदारीतून मुक्त केलंय. त्यांनी केलेल्या पापाचा हा परिणाम आहे. त्यांच्या सरकार फोडण्याच्या पराक्रमामुळे हे घडलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेलं यश आणि महायुतीच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं आहे.
फडणवीस यांना जनतेने जबाबदारीतून मुक्त केलंय
संजय राऊत म्हणाले, लोकसभेच्या निकालाने देवेंद्र फडणवीस यांना जनतेने जबाबदारीतून मुक्त केलेलं आहे. विधानसभेसाठी जर त्यांना मुक्तता हवी असेल, तर त्यांनी लक्षात घ्यावं विधानसभेला महाविकास आघाडी 185 प्लस जागा जिंकेल. त्यानंतर त्यांना कायमची मुक्तता मिळेल. त्यानंतर त्यांना त्यांच्या इतर संस्था आहेत. वनवासी आश्रम या ठिकाणी जाऊनच काम करायची वेळ येणार आहे. त्यांनी विष पेरलं ते आता उगवलं आहे, असं राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस राजकारणातील आनंदीबाई
देवेंद्र फडणवीस राजकारणातील आनंदीबाई आहेत. ज्यांचं काम कपट करणे, राजकारण करणं आहे. त्यामुळे ते राजकारणातील खलनायक झाले आहेत. तुम्ही जर पाण्यात देवेंद्र फडणवीस यांना लाथा मारून बाहेर काढलं. सरकार फोडण्याचा जो पराक्रम केला, त्यामुळे हे घडलं आहे. त्यामुळे आता नौटंकी करणं बंद करा. त्यांनी केलेल्या पापाचा हा परिणाम आहे. त्यामुळे त्यांनी ध्यानाला बसावं आणि चिंतन करावं, आपण काय पाप केले आहेत, काय विष कालवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचा अभ्यास करावा, जर त्यांना ते आठवत नसेल तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार सर्व पक्षी
चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार हे सर्व पक्षी आहेत ते कधी आमच्याबरोबर होते, कधी भाजप बरोबर होते. मोदीजींना सरकार बनायचा क्लेम करू द्या. अजून पाच वर्ष जाणार आहेत. रविंद्र वायकर यांचा विजय केला, यांनी पाकीटमारी केली आहे. जनता त्यांना उत्तर देईल. यावेळी आशिष शेलार यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, 10 जागा जिंकून आलो, तरी राजकारण सोडून देईल, असं ते म्हणाले. त्यांना नरेंद्र मोदींसारखी पोरकटपणाची वक्तव्य करण्याची सवय लागली आहे. त्यांचा मोदींचा अभ्यास झाला आहे, त्यामुळे कदाचित असं वक्तव्य करत असतात, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.