Sanjay Raut on Devendra Fadnavis : "लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना जबाबदारीने मुक्त केलं आहे. त्यांना विधानसभेसाठी मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी 185 जागा जिंकणार आहे. त्यानंतर त्यांना कायमची मुक्तता मिळेल. त्यानंतर त्यांना इतर संस्था आहेत. वनवासी आश्रम वगैरे संस्था आहेत. तिथेच जाऊन काम करावे लागणार आहे" असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 


पेशवे काळात आनंदीबाई होत्या, तसे फडणवीस राजकारणातले आनंदीबाई आहेत


संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले,  महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी जे पेरलं, ते विष पेरलं. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केलं. मी सकाळीच म्हणालो. पेशवे काळात आनंदीबाई होत्या. तसे फडणवीस राजकारणातले आनंदीबाई आहेत. कट कारस्थानं करणं आणि स्वार्थ साधणं यापेक्षा दुसरं काही त्यांनी केलेलं नाही. त्यांना राज्यात नेतृत्व करण्याची उत्तम संधी होती. त्यांनी ती गमावली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे रस्त्यावरचा बच्चा बच्चा सांगेन. त्यासाठीच हे मतदान झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दळभद्री राजकारणावरचा हा रोष आहे. 


विदर्भात जाऊन पाहा, लोक तुमच्याबाबत काय बोलत आहेत


पुढे बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, सरकार पाडण्यासाठी तुम्ही हुडी घालून फिरत होतात. तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि विदर्भात जाऊन पाहा, लोक तुमच्याबाबत काय बोलत आहेत. लोकांनी यांना लाथा मारुन बाहेर काढलं आहे. नितीन गडकरी स्वत:च्या ताकदीवर निवडून आले आहेत. अकोल्याची जागा तिरंगी लढतीमध्ये सटकून गेली. बाकी सर्वत्र आमची महाविकास आघाडीच आहे. 


मी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो : देवेंद्र फडणवीस


लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव  झाल्यानंतर उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची स्वीकारली आहे. "मी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. मी पक्ष नेतृत्वाला विनंती करतो की, मला सरकारमधून मुक्त करावे. मला विधानसभेसाठी काम करायचे आहे", अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis : राजीनामा हे त्यावरील सोल्यूशन असू शकत नाही, फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून पहिली प्रतिक्रिया