मुंबई : महाराष्ट्र भाजपचे (BJP) प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.  लोकसभा निवडणुकीत भाजपला (Lok Sabha Election Result) जे अपयश आलेलं होतं त्याची जबाबदारी स्वीकारुन राज्य सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती पक्षनेतृत्त्वाला केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय मागं घ्यावा,असं आवाहन अमोल मिटकरी यांनी केलं आहे.  


देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 


“भाजपच्या राज्यातल्या पराभवाची जबाबदारी मी घेतो. मला आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यासाठी म्हणून मला राज्य सरकारमधून मोकळं करावं, ही विनंती पक्षनेतृत्वाला करत आहे.” ,असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 


अमोल मिटकरी काय म्हणाले?


मला असं वाटतं देवेंद्रजी राज्याचे मोठे नेते आहेत, यश अपयश चालू राहतं, महायुतीला जसा निकाल येणं अपेक्षित होतं, तसं यश मिळालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या तत्त्वाला अनुसरुन निर्णय घेतला असेल. मात्र, महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करुन निर्णय मागं घ्यावा, असं अमोल मिटकरी म्हणाले. 


अमोल मिटकरी पुढं म्हणाले, महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये समन्वय असला पाहिजे.  उद्या जर दादांनी म्हटलं की बारामतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देतो असं म्हटलं तर कसं चालेल, असं अमोल मिटकरी म्हणाले.  राजीनामा हे त्यावरचं सोल्युशन असू शकत  नाहीत. देवेंद्र महाराष्ट्राचे  मोठे नेते आहेत. महायुतीनं त्यातून गंभीर पणे नोंद घेऊन  महाविकास आघाडीचे विशेषता: संजय राऊत यांचं तोंड बंद करावं, असं अमोल मिटकरी म्हणाले. 


विरोधकांनी नरेटिव्ह सेट केलं होतं, संविधानाच्या बाबतीत, हे लोकं सत्तेत आले तर संविधान बदलतील, अशा स्वरुपाचं महाविकास आघाडीनं नरेटिव्ह निर्माण केलं होतं. भावनिकतेच्या जोरावर महाविकास आघाडीनं इतक्या जागा मिळवल्या. आमच्या हातात दोन महिने आहेत, आम्ही विधानसभेत दमदार कमबॅक करु, असं अमोल मिटकरी म्हणाले.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? पाहा व्हिडीओ



लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल


भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1



महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8


संबंधित बातम्या : 


मित्र पक्षांसमवेत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत; महायुतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान, 'चर्चा तर होणार'


 फडणवीस म्हणाले, मला उपमुख्यमंत्री पदावरुन मुक्त करण्याची विनंती करणार; बावनकुळेंचाही मोठा निर्णय