मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.यासाठी मतदान सुरु आहे. आमदारांकडून मतदान सुरु असताना संजय राऊत (Sanjay Raut) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी हस्तोंदलन केलं. यानंतर संजय राऊत आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट झाली. चंद्रकांत पाटील यांनी माघारी येऊन संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी अरे व्वा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे एकमेकांनी असं म्हटलं. मात्र, हा संवाद राजकीय नव्हता, चहा पिण्यासाठी एकत्र येऊया, असं म्हणायचं होतं, असं संजय राऊत म्हणाले. माझी लाईन कधीही चुकत नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले.   



 महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी होतील. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, आमचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे उमेदवार विजयी होतील, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात आम्ही दिल्लीत मोदींना भेटतो, अमित शाह लॉबीत भेटतात. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. आमचे त्यांचं व्यक्तिगत भांडण नाही. ते वैचारिक भांडण आहे. 


आम्हाला बघून प्रत्येकाला माघारी फिरावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले. जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, अजित पवार, रमेश चेन्निथला भेटले. चांगलं वातावरण आहे आणि ते तसंच रहायला पाहिजे. महाराष्ट्राचं राजकारण निर्मळ होतं.महाराष्ट्राच्या राजकारणात विषाचा प्रवाह दुर्दैवानं भाजपनं सुरु केला, असं संजय राऊत म्हणाले. 


अनिल देशमुख तुरुंगात होते आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नाकारला गेला होता. निवडणूक आयोग तटस्थ असेल तर गणपत गायकवाड यांना मतदान करु देणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. 


महाविकास आघाडीचे तीन उमेदवार जिंकतील, असं संजय राऊत म्हणाले. इतकी वर्ष एकमेकांसोबत काम केलं, भेटी गाठी होत असतात. आमचं त्यांच्यासोबत वैयक्तिक भांडण नाही, राजकीय आहे.चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चहा पिण्यासाठी एकत्र यायचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. 



विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार


भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत 
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे a
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर 
काँग्रेस : प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पुरस्कृत : जयंत पाटील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : मिलिंद नार्वेकर   


संबंधित बातम्या : 


Vidhan Parishad election Live Updates : मोठी बातमी! गणपत गायकवाड यांना मतदान करण्याची परवानगी, निवडणूक आयोगाचा निर्णय


गणपत गायकवाड वेटिंगवर, मनसेच्या राजू पाटलांचं ठरलं, मोहिते पाटील भाजप कार्यालयात, विधानभवनात काय घडतंय?