Babanrao Taiwade Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्याचे राजकारण अक्षरक्ष: ढवळून निघाले आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज होम ग्राउंडवर म्हणजेच जालन्यात (Jalna) रॅली होणार आहे. सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढत आहेत. सकाळी 11 वाजता जरांगे पाटील यांची जालना शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालना शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष  डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade)  यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे.


जरांगे पाटील यांना असं शोभत नाही- डॉ. बबनराव तायवाडे   


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पध्दत चुकीची आहे. त्यांच्या मागण्या त्यांनी सरकार पुढे मांडायला पाहिजे. सरकारच त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करतील. त्यामुळे त्यांनी सरकार विरोधात बोलावं.एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलणं जरांगे पाटील यांना शोभत नाही. जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा मी निषेध करतो. परिणामी राज्यात उद्या मराठा- ओबीसी संघर्ष झाला, तर त्याला मनोज जरांगे जवाबदार असतील, असे परखड मत व्यक्त करत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी मनोज जरांगे यांना जबाबदार ठरवले आहे. ते नागपूर येथे बोलत होते.


 ....तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करेल


मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे ओबीसी ची बाजू मांडतात. याचा अर्थ ते मनोज जारांगेला विरोध करतात असा त्याचा अर्थ नाही. जरांगे यांना कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. आपली मागणी मांडण्याचा संविधानिक अधिकार प्रत्येकाला आहे. पण ती मागणी मान्य होणारी आहे का, हे पण तपासलं पाहिजे. ओबीसी (OBC) समाजाचा सरकारवर विश्वास आहे. म्हणून  ओबीसी समाज शांत  आहे. सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आहे, हे माहिती पडलं तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. असा इशाराही डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी यावेळी दिला. 


मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज जालन्यात 


मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज जालना येथे दाखल होणार आहे. काल बीडच्या रॅलीनंतर अंतरवाली सराटी येथे मुक्कामी असलेले मनोज जरांगे हे 11 वाजता जालना शहरांमध्ये दाखल होतील. जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. यासाठी आयोजकांकडून तयारी करण्यात आली असून, रॅली दरम्यान तीन ठिकाणी मनोज जरांगे यांचे जेसीबी आणि मोठ्या फुलांचे हार घालून स्वागत होणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या