Sanajay Raut on Worli Hit And Run : मुंबई : मुंबईत (Mumbai News) हिट अँड रन (Hit And Run Case) करुन पळालेला मिहीर शहा (Mihir Shah) सुरतमध्ये आहे की, गुवाहटीमध्ये (Guwahati) असा थेट सवाल संजय राऊत (Sanjay raut) यांनी विचारला आहे. तसेच, एका मराठी महिलेला दारूच्या नशेत गाडीखाली चिरडून हा कोणी मिहीर शाह मुंबई पोलिसांच्या हातातून सुटतो कसा? असाही प्रश्न संजय राऊतांनी विचारला आहे. 


वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह संपूर्ण शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "वरळी हिट अँड रन प्रकरणातला  मुख्य आरोपी आणि त्याचे वडील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मला असं कळालं त्यांचे व्यावसायिक संबंधही आहेत. त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत. पोलिसांनी त्यांना अटक कशी केली. पोलिसांनी त्यांना अटक करुन मोठा गुन्हा केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला खून केल्यानंतर अटक कशी होऊ शकते."


"मुख्य आरोपी कुठे आहे, फरार आहे ना त्यांचा मुलगा. एका मराठी महिलेला दारूच्या नशेत गाडीखाली चिरडून हा कोणी मिहीर शाह मुंबई पोलिसांच्या हातातून सुटतो कसा? कुठे गेलाय तो, सूरत की, गुवाहाटी? कुठे ठेवलंय त्याला सूरतला की, गुवाहाटीला लपवलंय? याचा खुलासा मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी करायला हवा.", असं संजय राऊत म्हणाले. 


"वरळीच्या रस्त्यावर ज्या प्रकारे रक्तपात झाला, गाडीखाली एक मराठी कोळी दाम्पत्य चिरडलं गेलं, याला कोण जबाबदार आहे? दारूच्या नशेत काय चाललंय? मुंबई महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? पण आज कायदा-सुव्यवस्था नाहीच, हे मला खात्रीनं सांगावसं वाटतंय.", असं संजय राऊत म्हणाले आहेत. 


मोदी-अमित शाहांमुळंच जवानांवर शहीद होण्याची वेळ : संजय राऊत 


शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "देशातील जवना रोज शहिद होत आहे. मणिपूर आणि जम्मू काश्मीर ही दोन्ही राज्य देशाच्या नकाशावर नाहीत, अशा पद्धतीनं पंतप्रधान मोदी देशाच्या बाहेर राहणं पसंत करतायत. जे पुतीन लोकतंत्राला मानत नाहीत. ते पुतीन मोदींची वाहवा करत आहेत."


"पाच जवानांवर हल्ला झाला, ते शहीद झालेत. नवं सरकार आल्यापासून जवानांवर सात हल्ले झाले आहेत. त्यातील एक जवान अकोल्यातला होता. अमित शहा काश्मिरची स्थिती नियंत्रणात आहे, असं सांगून भ्रमित करतायत. मोदी शपतविधीनंतर कधी इटली, कधी रशियात असतात. जवानांना होणाऱ्या हल्लांना मोदी-शाह जबाबदार आहेत.", असं संजय राऊत म्हणतात. 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut on Narenra Modi | मोदी सरकारच्या कार्यकाळात जवानांवर हल्ले वाढले, संजय राऊतांची टीका



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Worli Hit And Run : वरळी सी लिंकवर मिहीर शहानं सीट बदलली अन् BMW कारनं कावेरी नाखवांना पुन्हा चिरडलं; धक्कादायक माहिती समोर