Sanjay Raut on Raj Thakckeray, Mumbai : "सुपारी गँग नसती तर 38 जागा आल्या असत्या. राज ठाकरेंनी 400 जागा लढाव्यात, राज ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम आहे तो म्हणजे महाराष्ट्रांच्या शत्रूंच्या पालख्या वाहून शिवसेनेचे उमेदवार पाडणे. महाराष्ट्राचा मराठी माणूस आजही शिवसेनेच्याच पाठिशी आहे" अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केली. ते एबीपी माझाशी बोलत होते.
मशाल हवं तितक्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही
संजय राऊत म्हणाले, मशाल हवं तितक्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही, नाही तर निकाल अजून वेगळा असता. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले व्हिलन आहेत. 2019 ला काय झालं ते भाजपचे लोक सांगत नाहीत. बाळासाहेबांचा पक्ष फोडला, राजकीय संस्कृतीत विष कालवलं म्हणून भाजपचा पराभव झाला. महायुतीनं निवडणुकीत 50 ते 75 कोटींचा खर्च प्रत्येक मतदारसंघात खर्च केलाय. हे भाजपनेच महाराष्ट्रात सुरु केलंय. मुख्यमंत्र्यांनीही हेच काम केलंय.
काँग्रेसच्या विजयासाठी शिवसेनेनं जीवाचं रान केलं
संविधाव बदलाचा नॅरेटिव्ह कधीच खोटा नव्हता, मोहनराव भागवत तेव्हाच का बोलले नाही? आता बोलण्यात काहीही अर्थ नाही. जागांच्या वाटपाची चर्चा आम्ही पक्षाध्यक्षांसोबत करु. राहुल गांधीपासून चेन्नीथला आहेत. काँग्रेसच्या विजयासाठी शिवसेनेनं जीवाचं रान केलं. त्यामुळे हाताचे आकडे आलेत. काँग्रेसनं 13 जागा जिंकल्यात त्याचा आम्हाला आनंद आहे, राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं ही आमची इच्छा आहे. राहुल गांधींनी विरोधीपक्ष नेते व्हावं, मोदी त्यांना घाबरतात. भाजपचा विजय नाही तर पराभव आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
जे सांगलीत झालं ते विधानसभेत होणार नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीनं काम केलं नाही
आम्ही गद्दारांना परत घेणार नाही. जे सांगलीत झालं ते विधानसभेत होणार नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीनं काम केलं नाही, नाहीतर चंद्रहार पाटील जिंकले असते. मविआच्या तिन्ही पक्षांच्या विधानसभेसाठी जागावाटपाची चर्चा सुरु झालीय. मराठी मतदारांसह इतर धर्मियांचं मतदान शिवसेनेला झाल्यानं मनसेच्या पोटात दुखतंत. सुपारी गँग नसती तर 38 जागा आल्या असत्या. राज ठाकरेंनी 400 जागा लढाव्यात, राज ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम आहे तो म्हणजे महाराष्ट्रांच्या शत्रूंच्या पालख्या वाहून शिवसेनेचे उमेदवार पाडणे. महाराष्ट्राचा मराठी माणूस आजही शिवसेनेच्याच पाठिशी आहे,असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या