Sanjay Raut : बीड येथील गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेला खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याचे समजते. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या सगळ्याच माफियांना अभय आहे. सगळ्याच माफियांना राजकीय आशीर्वाद आहे. जे पक्ष सरकार आहेत, त्यातील अनेक मंत्री माफिया आणि खंडणीखोरांशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरावर दबाव आहे, आक्रोश आहे. पण अजित पवार यांच्यात हिंमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचीही हिंमत नाही.
जातीय व्होट बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न
कारण संतोष देशमुख यांचा खून, सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हे फार मोठे षडयंत्र आणि कारस्थान होतं. त्यामध्ये नक्की काय आहे हे सांगण्यापेक्षा आपली जातीय व्होट बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. तो निषेधार्ह आहे. धनंजय मुंडे यांच्या लोकांनी ज्यांचे खून केले हे त्यांच्याच समाजाचे आहेत. बीड भागातले 90 टक्के खून हे त्यांच्यात समाजाचे आहेत. या जात आणू नका, अपराधी हा अपराधीच असतो, अपराध्याला जात आणि धर्म नसतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय.
पापाचे प्रायश्चित्त म्हणून दहा लाख रुपये देतात
तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी सरकारने दिलेली मदत नाकारली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, तुम्ही खून करायचे आणि खुनाची किंमत मोजायची हा काय प्रकार आहे? त्यांचा खून हा पोलीस कस्टडीत झाला. हा कोठाडीतला खून आहे. ज्यांनी खून केले त्यांचे समर्थन तुम्ही विधानसभेत केले आणि त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून दहा लाख रुपये देतात, याचा धिक्कार व्हायला पाहिजे, अशी टीका त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
आणखी वाचा
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट