Sanjay Raut Latest Speech: ''निवडणूक आयोगाने आमचं चिन्ह काढून घेतलं, नाव काढून घेतलं, मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आजही ठामपणे भगवा हाती घेऊन उभी आहे'', असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे गटाकडून मालेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. राज्यात पुन्हा एकदा आपलं राज्य येणार आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील, असं यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.


Sanjay Raut Latest Speech: आता आमच्या तुफानाला कुणी रोखू शकत नाही : संजय राऊत 


तत्पूर्वी सभेला संबोधित करताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ''मालेगावात तुफान उसळला आहे. आता या तुफानाला कोणी रोखू शकत नाही. मालेगावात एक फिल्म इंडस्ट्री आहे, त्याला मालेगावचे शोले म्हणतात, हे मालेगावचे शोले भडकले आहेत.''


Sanjay Raut Latest Speech: निवडणूक आयोगाला विचारून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली : संजय राऊत 


राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ''शिवसेना काय आहे, हे पाहायचं असेल, तर निवडणूक आयोगाने येथे येऊन पाहावं. निवडणूक आयोगाला विचारून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नाही. बाळासाहेब नावाचा एक अद्भुत माणूस या पृथ्वीवर जन्माला आला आणि त्यांनी देशात आणि महाराष्ट्रात शिवसेना नावाचं महाकाव्य निर्माण केलं, ती ही शिवसेना आहे.'' 


Sanjay Raut Latest Speech: मालेगावचा ढेकूण ठेचायला तोफेची गरज नाही, राऊतांच्या दादा भुसे यांना टोला 


मंत्री दादा भुसे (Dadaji Bhuse) यांना टोला लगावत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ''सकाळपासून टीव्ही चॅनल्सवर बातमी सुरू आहे की, आज शिवसेनेची तोफ धडाडणार, मात्र या मालेगावचा ढेकूण ठेचायला तोफेची गरज नाही. मग मालेगावात आपण सभा का घेत आहोत? शिवसेना (shiv sena) तुटलेली नाही. शिवसेना वाकलेली नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक मालेगावसह संपूर्ण महाराष्ट्र शिवसेनेच्या पाठीशी आहेत, हा संदेश देशाला आणि महाराष्ट्राला देण्यासाठी आपण ही सभा घेत आहोत. '' ते (Sanjay Raut) म्हणाले, कांद्याला भाव नाही. कांदा रस्त्यावर फेकला जात आहे. मात्र आपल्याला त्या सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचंय, असं ते म्हणाले आहेत. 


संबंधित बातमी : 


Uddhav Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत ...त्यांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव यांचा राहुल गांधी यांना इशारा