Chandrakant Patil : दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस विधानभवनात एकत्र दाखल झाले होते. दोघांच्या एकत्र प्रवेशावरुन दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहे. यावर आज भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray)-फडणवीस (devendra fadnavis) एकत्र येण्याचा कुठेही चर्चा नाहीत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) दिली आहे. 


Chandrakant Patil : 'मात्र  राजकारण कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं'


चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ''उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस परत येण्याच्या कुठेही चर्चा नाही. बंद खोलीत नाही आणि ओपन  गार्डनमध्ये पण नाही. मात्र सूत्रांवरून सुतावरून काही परीक्षण केलं जातंय,असे काही चान्स नाहीत. पण राजकारण कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं.''


आज मालेगाव येथे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची जाहीर सभा आहे. याच सभेसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याना उद्धव ठाकरे यांचे उर्दूत पोस्टर लावले होते. यावर बोलताना पाटील म्हणाले आहेत की,  मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागणे हे काय लगेच हिंदुत्व सोडलं असं नाही. मुस्लिम समाजाला उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी काही आश्वस्त केलं असेल म्हणून मालेगावमध्ये बोर्ड लागले असतील.


Chandrakant Patil : राहुल गांधींवर काय म्हणाले चंद्रकांत पाटील 


खासदारकी रद्द झाल्यानंतर शनिवारी राहुल गांधी (Rahul Gandhi Latest News) यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ज्या भाषणामुळे त्यांना शिक्षा झाली त्याबद्दल माफी मागायला 'मी सावरकर नाही', असं ते म्हणाले होते. यावर बोलताना पाटील म्हणाले, राहुल गांधी आणि सावरकर यांचं काय आहे,  ते सारखी टीका करत असतात. मग सावरकरवर तेच का बोलताता? इतर काँग्रेस (congress) मधील कोणी बोलताना दिसत नाही, त्यांचं वैयक्तिक काही आहे का, हे पाहावं लागेल.


इतर महत्वाची बातमी: