Lok Sabha Election 2024 : यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray) संजय देशमुख (Sanjau Deshmukh) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, मात्र अजूनही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून उमेदवार निश्चित नाही. या ठिकाणी सलग पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या नावावर भाजप (BJP) अनुकूल नसल्याने नवीन उमेदवार शिंदे यांना शोधावा लागत आहे.
संजय राठोड लोकसभेसाठी इच्छुक नसल्याची माहिती
बंजारा समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव पुढे करून त्यांना उमेदवारी घेण्यासाठी समजूत काढली जात आहे. दरम्यान, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राठोड हे लोकसभा लढवण्यास इच्छुक नाहीत त्याऐवजी त्यांनी त्यांची पत्नी शितल संजय राठोड यांचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राठोड यांची पत्नी शितल राठोड निवडणूक लढवणार?
महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर मुख्यमंत्री कोणी असो संजय राठोड यांना मंत्रीपद निश्चित मानले जाते, तसेच संजय राठोड यांना उमेदवारी दिल्यास पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे राठोड लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर आली आहे.
शितल राठोड यांच्यासह या नावांचीही चर्चा
संजय राठोड यांच्या पत्नीस वरिष्ठ नेत्यांनी नकार दिल्यास त्यांच्या जागी दोन जणांना संधी मिळू शकते, निलय नाईक किंवा मनीष उत्तमराव पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर येत आहे.
मविआला आणखी एक धक्का? महायुतीकडून या नेत्याशी बोलणी सुरु
महायुतीकडून महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरु आहे. सध्या मनीष पाटील महाविकास आघाडीत आहेत. मात्र त्यांच्याशी बोलणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. मनीष पाटील (Manish Patil) हे उत्तमराव पाटील यांचे सुपुत्र, उत्तमराव पाटील (Uttamrao Patil) हे महाराष्ट्राचे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते होते, आमदार, खासदार आणि मंत्री देखील होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :