एक्स्प्लोर

Sanjay Jadhav : मनोज जरांगेंच्या भेटीला आलेल्या खासदार संजय जाधव यांना दिशा सालियन प्रकरणी प्रश्न, संजय जाधव उत्तर देत म्हणाले...

Sanjay Jadhav : परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

छत्रपती संभाजीनगर : परभणीचे खासदार संजय जाधव यांनी छत्रपती संभाजीगनरमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अंतरवाली सराटी हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघात येत असल्यानं जरागेंचं आणि माझं नातं जिव्हाळ्याचं असल्याचं म्हटलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन सुरु असलेल्या घडामोडींबाबत प्रश्न विचारला असता संजय जाधव यांनी ते प्रकरण माहिती नसल्याचं म्हटलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या विषयासाठी आलोय त्या विषयावर विचारा असं उत्तर खासदार जाधव यांनी दिलं.   

संजय जाधव काय म्हणाले? 

खासदार संजय जाधव म्हणाले अंतरवाली सराटी हे गाव माझ्या लोकसभा मतदारसंघातील आहे. मनोज जरांगे पाटील आणि माझं नातं हे जिव्हाळ्याचं आहे.त्यामुळे माझ्या घरातील व्यक्ती जर आजारी असेल तर जाऊन भेटणं आणि त्यांची विचारपूस करणे माझं कर्तव्य आहे, असं त्यांनी म्हटलं.

संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीत मेळावा घेतला होता, त्यावरुन मनोज जरांगे यांनी टीका केली होती. यासंदर्भात बोलताना संजय जाधव म्हणाले की घरातल्या एखाद्या कर्त्या व्यक्तीला त्यांच्या माणसाला बोलायचा अधिकार असतो, त्यामुळे ते बोलले तर निश्चितच वाईट वाटण्याचं कारण काही नाही. त्यावेळी मनोज जरांगे यांची भावना वेगळी होती की मी समाजासाठी लढतोय आणि तुम्ही अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेत आहात. त्यामुळे ते साहजिक होतं असं संजय जाधव यांनी म्हटलं.  भाषण संपल्यानंतर मी शेवटी बोललो होतो, पाटलांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, याची आठवण देखील त्यांनी करुन दिली.    

मनोज जरांगे पाटील उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर टीका होत असल्यासंदर्भात विचारल्यास संजय जाधव यांनी ते बाकीचं नको मला माझा विषय काय आहे ते माहिती आहे, असं संजय जाधव म्हणाले. 

विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर केलेल्या आरोपाबाबत विचारलं असता संजय जाधव म्हणाले की त्यांच्याकडे जे काय असतील पुरावे ते शासनाकडे द्यायला पाहिजेत. त्यानंतर शासन त्याची शहानिशा करेल, आरोप करायला काय लागतं उचलली जीभ लावली टाळूला, या म्हणण्याला अर्थ नाही. कोणतीही गोष्ट पुराव्या शिवाय सिद्ध होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. 

दुष्काळाच्या स्थिती संदर्भात प्रश्न विचारला असता संजय जाधव यांनी विशेष अधिवेशन घ्यावं न घ्यावं पण दुष्काळ जाहीर करावा ही मागणी असेल, पिण्याच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न असेल अनेक गोष्टींनी शेतकरी त्रस्त आहे.  1972 चा दुष्काळ आम्ही ऐकला होता,त्यामुळे आता अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावं.शेतकऱ्याला या दुष्काळाच्या धर्म संकटातून वाचवलं पाहिजे, देशाचा पोशिंदा हा शेतकरी आहे, त्यामुळे बळीराजा संकटात असेल तर सगळ्यांची मदत करण्याची भूमिका असली पाहिजे, असंही संजय जाधव यांनी म्हटलं.  

दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर सुरु असलेल्या आरोपांवर विचारलं असता संजय जाधव यांनी त्या विषयावर नको ना बाबा आता,कारण तो विषय मला माहितीच नाही असं म्हटलं. ज्या विषयासाठी आलो त्याच विषयाबाबत विचारा, असं संजय जाधव म्हणाले.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीत अर्थखातं मिळवण्याची धमक नाही, फडणवीस ब्लॅकमेल करुन अर्थखातं त्यांच्याकडे ठेवतायेत, सपकाळांचा हल्लाबोल 
राष्ट्रवादीत अर्थखातं मिळवण्याची धमक नाही, फडणवीस ब्लॅकमेल करुन अर्थखातं त्यांच्याकडे ठेवतायेत, सपकाळांचा हल्लाबोल 
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Embed widget