सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीने सांगलीची (Sangli) जागा अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची घोषणा केली आहे. मात्र, अजूनही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे सांगलीत आज पार पाडणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेस बहिष्कार (Congress) टाकणार आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची  उपस्थिती असणार आहे. (Congress  Boycotts Maha Vikas Aghadi Meeting)


ठाकरे गटाकडून उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी विष्णूदास भावे नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतलीय. विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने मेळाव्याला जाणार नाहीत.  सांगली जिल्ह्यातील प्रमुख   काँग्रेस नेते नागपूरला जाण्याची शक्यता आहे.   महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी रमेश चेन्निथला, नाना पटोले यांनी   काँग्रेस नेत्यांना भेटीसाठी निरोप दिल्याची माहिती आहे. 


राष्ट्रवादीचे नेते नागपुरला जाणार नाही


राष्ट्रवादी शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विश्वजीत कदम यांनाही निमंत्रण  देण्यात आले आहे . मात्र मेळाव्याला न जाण्याची भूमिकाकाँग्रेसने घेतली आहे.  विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने मेळाव्याला जाणार नाहीत. शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील,माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हा  काँग्रेसला मेळाव्यासाठी निमंत्रण  देण्यात आले आहे.


काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी समर्थक आग्रही


सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक देखील प्रचंड आग्रही आहेत.  विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी पत्र लिहले. तसेच रक्ताने लिहलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवण्यात आले. 


सांगलीती घडामोडींना वेग


काँग्रेसमध्ये सांगलीच्या उमेदवारीवरुन अद्याप नाराजी कायम आहे.  आज शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ  महाविकासआघाडीचा मेळावा पार पडणार आहे. त्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रमुख नेते  नेते नागपुरला भेटीसाठी जाणार आहे. आज नागपुरच्या बैठकीत सांगलीच्या जागेवर शेवटचा निर्णय होणार आहे.  मात्र विशाल पाटील सांगलीत राहणार आहे. त्यामुळे सांगलीतील घडामोडींना वेग आला आहे.  


हे ही वाचा:


नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडलं, रडले आणि निवडणूक जिंकली; भाजप नेत्याचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप