Sachin Ahir : दक्षिण मुंबई लोकसभा या मतदारसंघासाठी मागील चार महिन्यांपासून भाजपला उमेदवार मिळत नाही. ते इकडे तिकडे बघत आहे. एकमेकांचे सहकार्य घेत आहेत. मनसे सुद्धा तिथे निवडणूक लढवण्यावर इच्छुक आहे ते भाजपला म्हणतात की आम्हाला पाठिंबा द्या. अरविंद सावंत (Arvind Sawant) यांचे काम चांगलं आहे. लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोणीही येऊ द्यात, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी म्हटले आहे.  


सचिन अहिर म्हणाले की, लालबाग सभा ही कार्यकर्त्याना मतदारांना साद घालण्यासाठी ही सभा आहे. मध्यम वर्गीय लोक या ठिकाणी राहतात.संपूर्ण राज्यात सध्या सभा होत आहे. निवडणुका लागल्या की, महविकास आघाडी सोबत सभा होतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 


अडाणींना काम गेलं तर यावर समस्या येऊ शकते


एमएमआरडीए वांद्रे रिक्लेमेशनवर सचिन अहिर म्हणाले की, ही जागा MSRDC आणि MMRDA ची जागा आहे. CRZ च काय? न्यायालयाला काय सांगणार? अडाणींना काम गेलं तर यावर समस्या येऊ शकते. मूळ कंपन्यांना निविदा न देता इतरांना दिल्याने याचा परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. 


राजकारणाची पातळी घसरली


कोस्टल रोड उद्घाटनावर सचिन अहिर म्हणाले की, जे काम पूर्ण झाले आहेत. पण, पंतप्रधान यांना वेळ नाही म्हणून हे सुरू होत नाही. इतर ही काम झाले. पण, राजकीय वेळ नसल्याने सुरू होत नाही. राजकारणाची पातळी घसरली आहे. आमच्या कारकीर्दीत हे काम सुरू झाले होते.


बारामतीत शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग


मुंबई बँक कार्यक्रमावर सचिन अहिर म्हणाले की, ही कोणत्या एका व्यक्तीची नाही राजकीय इव्हेंट होता कामा नये. ती मुंबईकरांची बँक आहे. निवडणूक पाहून हे होत आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत सचिन अहिर म्हणाले की, लोकसभा मतदार संघ मोठा आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचं वर्चस्व आहे. सुप्रिया सुळे यांचे चांगलं काम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


काही जण मीडियासमोर असं बोलतात


निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली. यावर सचिन अहिर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, माझ्या सारख्या कार्यकर्त्यासमोर असा प्रश्न आहे की, मी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांचे भाषण पाहिले आहे. पण, गेल्या काही वर्षात ही पातळी घसरली आहे. काही जण मीडिया समोर असं बोलतात, असे त्यांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर, काँग्रेसला महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातही झटका?