मुंबई : रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मंत्र्यांच्या विदेशी दौरे आणि राज्यातील नोकर भरतीच्या परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्यावरून सरकारवर टीका केली आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांच्या ओएसडीच्या अनेक कंपन्या असून, त्यांच्या संबधित कंपन्यांना परीक्षेचे कामं मिळत आहेत. तसेच, फडणवीसांच्या ओएसडीच्या एका विदेशी दौऱ्यावर 1 कोटी 88 लाखांचा खर्च झाला असल्याचं देखील रोहित पवार म्हणाले आहे. 


याबाबत बोलतांना रोहित पवार म्हणाले की, 23 नोव्हेंबर 2023 ला आम्ही एमआयडीसीकडे (MIDC) काही माहिती मागवली होती. यामधे विदेशात कोण-कोणते प्रवास झाले आणि त्यासाठी किती खर्च झाला याची माहिती मागवण्यात आली. डाओसमध्ये 32 लाख रुपये खर्च झाला. आत्तापर्यंत 42 ते 45 कोटी रुपये वेगवेगळ्या विदेशी दौऱ्यावर खर्च झाला आहे. तैवान देशात मंत्रीमोहदय गेले नव्हते केवळ अधिकारी तिथं गेले होते. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते. यासाठी 1 कोटी 88 लाख रुपये खर्च झाला. इतका खर्च कसा काय झाला? तुम्हीं प्राईव्हेट जेटने गेले होते का? कारण 5 लोकांवर 60 लाख रुपये कसा काय केला? असा प्रश्न रोहित पवारांनी केला आहे. 


एमआयडीसीला अधिकचा तपशील मागवला आहे. तैवान येथे एक भारतीय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला थेट पैसा देण्यात आला. 8 महिन्यांपूर्वी यांनी जो खर्च केला तो कसा दाखवायचा असा प्रश्न आता यांच्या समोर उभा राहिला आहे. यांनी आता मागच्या तारखेचे पत्र देउन खर्च दाखवण्याचा प्रयत्न कौस्तुभ ढवसे करत आहे. जपानला देवेंद्र फडणवीस गेले, तिथं खर्च एमआयडीसीने केला होता. तिथं देखील कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते याचं उत्तर द्यावं? असेही रोहित पवार म्हणाले. 


फडणवीसांच्या ओएसडीच्या कंपन्यांना कंत्राट


सरकारने परदेशात जाऊन केवळ 50 लाखांचे एमओयू केले आहेत हे गंभीर आहे. मग हे परदेशात गेले कशाला. कौस्तुभ ढवसे यांच्या अनेक कंपन्या आहेत. असा व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा ओएसडी झाला कसा काय? याचाच मिञ आयटी घोटाळ्याचा आरोपी आहे. ज्या कंपनीला कंत्राट दिलं होत त्याचा डायरेक्टर कौस्तुभ ढवसे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करतो. याचा अर्थ त्यांचा याच्याशी संबंध आहे. कारण देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना हा व्यक्ती त्यांच्या सोबत होता. त्यानंतर सत्ता गेली की हा व्यक्ती गायब झाला आणि आता देवेंद्र फडणवीस सत्तेत आले की पुन्हा कौस्तुभ ढवसे त्यांचा ओएसडी झाला आहे.


कौस्तुभ ढवसे एका प्रवासासाठी 30 लाख रुपये खर्च करतात 


लंडनमध्ये देखील यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. उदय सामंत जर्मनीला गेले होते. तिथं एका कंपनीने अश्र्वासन दिले की, आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहोत, मात्र प्रत्यक्षात कोणताही करार झालेला नाही. पुन्हा एकदा डाओसला सगळे नेते जाणार आहेत. या दौऱ्याला एक व्यक्ती जाणार आहे. जो आत्ता सतेत नाही. परंतू तो दौऱ्याला जाणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे एका प्रवासासाठी 30 लाख रुपये खर्च करतात. जो व्यक्ती संबंधित खात्याशी संबंधित देखील नाही, असाही आरोप रोहित पवार यांनी केला आहे. 


आयटी घोटाळ्यातील व्यक्ती सरकारमध्ये ओएसडी


तलाटी भरतीत भ्रष्टाचार झाला आहे. असे आम्ही सांगितलं आणि आम्ही हा मुद्दा मांडला. एका पत्रकाराने ही बातमी दिली, ती बातमी एफआयअरच्या आधारे दिली होती. तरीदेखील देवेंद्र फडणवीस हे त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करू असं म्हणतात. नाशिक, सांगली, श्रीगोंदा येथे पेपरफुटी झाली. ज्याने पेपर फोडला तो पोलीस अधिकारी आहे. भाजप काळात जी भरती झाली त्या भरतीमध्ये हा व्यक्ती पोलीस झाला आणि आता त्याची बायको तलाठी झाली आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तीला सारखे मार्क मिळाले आहेत. जे कर्मचारी टीसीएसमध्ये काम करतात त्यांच्या कुटुंबातील मुलांना चांगले मार्क मिळाले आहेत हे कसं काय शक्य आहे?  अनेक ठिकाणीं मास कॉपी देखील झाली आहे. आयटी घोटाळ्यातील व्यक्ती आता सरकारमध्ये ओएसडी आहे. सरकार गेले त्यावेळीं ही व्यक्ती परदेशात होती. आता पुन्हा ही व्यक्ती सत्तेत सहभागी होऊन काम करत असल्याचे रोहित पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


अजित दादांनी पुन्हा शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं; रोहत पवार म्हणतात, 'त्यांच्यावर महराष्ट्राची जबाबदारी'