Rohit Pawar On Raj Thackeray MPSC Protest Pune: राज ठाकरेंनी सांगितलं, मुख्यमंत्री सकारात्मक, लवकरच चांगली बातमी; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rohit Pawar On Raj Thackeray MPSC Protest Pune: राज ठाकरे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी येणार, अशी माहिती दिली आहे. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar On Raj Thackeray MPSC Protest Pune: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा केली. यामध्ये देवेंद्र फडणवीस खूप सकारात्मक आहेत आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरेंच्या या माहितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Rohit Pawar On Raj Thackeray MPSC Protest)
रोहित पवार काय म्हणाले? (Rohit Pawar On Raj Thackeray MPSC Protest)
आदरणीय राज ठाकरे , अध्यक्षांचा राजीनामा आणि आयोगाचे संपूर्ण शुद्धीकरण हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आणि जनभावना असून हजारो विद्यार्थी त्यासाठी गेल्या 9 दिवसापासून आंदोलन करत आहेत. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी केलेल्या शेवटच्या चर्चेत 70 हजार पदांच्या भरतीसह बाकी इतर मागण्या विद्यार्थ्यांच्यावतीने मान्य करवून घेतल्याच आहेत, असं रोहित पवार म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या झालेल्या चर्चेत ते सकारात्मक असतील आणि यातूनच मुख्यमंत्री ‘विवेक’ दाखवत अध्यक्षांचा राजीनामा आणि आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी निर्णय घेणार असतील तर या चांगल्या बातमीची हजारो विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत. चांगली बातमी येईल, ही अपेक्षा, असंही रोहित पवारांनी सांगितलं.
आदरणीय राज ठाकरे साहेब, अध्यक्षांचा राजीनामा आणि आयोगाचे संपूर्ण शुद्धीकरण हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आणि जनभावना असून हजारो विद्यार्थी त्यासाठी गेल्या ९ दिवसापासून आंदोलन करत आहेत. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी केलेल्या शेवटच्या चर्चेत ७० हजार पदांच्या भरतीसह बाकी इतर मागण्या विद्यार्थ्यांच्यावतीने मान्य करवून घेतल्याच आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या झालेल्या चर्चेत ते सकारात्मक असतील आणि यातूनच मुख्यमंत्री ‘विवेक’ दाखवत अध्यक्षांचा राजीनामा आणि आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी निर्णय घेणार असतील तर या चांगल्या बातमीची हजारो विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत. चांगली बातमी येईल, ही अपेक्षा..! #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2026
राज ठाकरे काय म्हणाले होते? (Raj Thackeray On MPSC Protest Pune)
5 ऑक्टोबर 2026 ला मी जेव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. तेव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
पुण्यातील एस.एम. जोशी पुलावरील एमपीएससीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस- (Rohit Pawar MPSC Protest Pune)
पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरु असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा (MPSC Protest Pune) आज नववा दिवस आहे. काल पुणे पोलिसांनी एस.एम जोशी पूल मोकळा करा, असं आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितलं. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत विद्यार्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आंदोलनावर ठाम आहेत.
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी येणार, राज ठाकरे काय म्हणाले?, VIDEO
संबंधित बातमी:
Before You Go
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा






















