पुणे: खेडमध्ये जप्त केलेली पाच  कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. आमदार रोहित पवारांकडून (Rohit Pawar)  पैशांचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.    पुण्याजवळ पकडलेल्या रक्कमेचा हा व्हिडीओ असल्याचा दावा  सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा आल्याचा आरोप आमदार  रोहित पवारांनी केला आहे.  हे पैसे आमदार  शहाजी बापू पाटील यांची असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार असल्याचे देखील ते म्हणाले. 


रोहित पवार म्हणाले, शहाजी पाटील यांचे पैसे आहेत अशी चर्चा आहे. एकूण पाच  गाड्या होत्या. 25 कोटी रुपये होते अशी माहिती आहे. लोकसभेला यांनी खूप पैसा वाटला मात्र तरीदेखील लोकांनी यांना स्वीकाराले नाही. आता विधानसभेला 50 कोटी वाटतील असं वाटतंय . जो मलिदा त्यांना मिळालाय तो वाटत आहे . मुंबईतून हा पैसा जात होता. पण महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता त्याला बाधणार नाही.


जागावाटप आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर : रोहित पवार


अनेक पदाधिकारी अजित पवारांच्या पक्षातील नाराज आहेत. अनेक जण आमच्या सोबत येत आहेत. जागावाटप आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होईल . चर्चा सकारात्मक झाली आहे. जागेच्या वादाचा जो आकडा येतोय तो कमी आहे, असे रोहित पवार म्हणाले. 


 






रोहित पवार काय म्हणाले आपल्य ट्वीटमध्ये?


सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला  कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे.  कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!


हे ही वाचा :


 काकाविरुद्ध पुतणी इरेला पेटली, राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात येताच पुतणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत!