Ravikant Tupkar on Eknath Shinde : "मुख्यमंत्री सत्तेत आल्यावर म्हणाले होते की, आता राज्यात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत", असं शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar ) म्हणाले. ते बुलढाणा (Buldhana) येते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) शेतकरी आत्महत्येवरुन निशाना साधला.
बुलढाण्यात 5 महिन्यात 79 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
विदर्भात अजूनही शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. बुलढाणा जिल्ह्यात 1 जानेवारी ते 27 मे 2024 या पाच महिन्याच्या काळात 79 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक 24 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. विविध कारणामुळे आत्महत्या केलेल्या 79 शेतकऱ्यांपैकी 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या असून 2 अपात्र तर 73 शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासन दरबारी चौकशीसाठी प्रलंबित आहेत. या आकडेवारी बद्दल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर खोचक टीका केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या