Ratnagiri : मित्रांबरोबर दुपारी नदीवरती पोहायला केलेल्या पाच मित्रांपैकी दोघा जणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झालाय. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुंबाड येथील जगबुडी नदीत आज (दि.20) घडली. सौरभ हरिश्चंद्र नाचरे (वय 19) आणि अंकेश संतोष भागणे (वय 20) रा. दोघेही पन्हाळजे असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार सौरभ आणि अंकेश आपल्या अन्य तीन मित्रांसोबत तुंबाड गावानजीक वाहणाऱ्या जगबुडी नदीमध्ये दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास पोहायला गेले. सर्व मित्र आसपासच्याच गावातले होते. नदीमध्ये पाण्यासाठी उतरले असता होत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सौरभ हरिचंद्र नाचरे आणि अंकेश  संतोष भागणे, हे दोन तरुण पाण्यात बुडाले.


मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही


इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही.  इतर मित्रांनी तुंबाड गावात जाऊन ही गोष्ट कळवल्यानंतर खेड पोलिसांना कळविण्यात आले. खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी जगबुडी नदीच्या डोहातून दोन्हीही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  


खेड पोलिसांचे आवाहन 


गेले तीन ते चार दिवस पडणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसामुळे सर्वच नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढत असून दुपारच्या वेळी पोहायला जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी पाण्याचा अंदाज असल्याशिवाय तसेच पोहता येत नसल्यास पाण्यात जाऊ नये असे आवाहन खेड पोलिसांनी केले आहे.


रत्नागिरीतही कारने 2 तरुणांना उडवले


रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri Accident) मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रोडवर दोन पादचारी तरुणांना कारने उडवलय. मात्र दोन्ही तरुण बोनेटवर आदळल्याने सुदैवाने बचावले. कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु, हा  चित्तथरारक प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहरात सामान खरेदी करून दोन तरुण बसस्थानकाकडे  जात असतानाच अचानक पाठीमागून आलेल्या कारने लागोपाठ दोन तरुणांना उडवले. परंतु सुदैवाने दोन्ही तरुण गाडीच्या दर्शनी भाग बोनेटवर आदळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार भरधाव वेगात नसल्याने सुदैवाने दोन्ही तरुण बचावले (Ratnagiri Accident) आहेत. परंतु तरुणांना उडवणाऱ्या कारचालकाला मात्र नागरिकाच्या रोशाला बळी पडावे लागले. काही काळ वातावरणही तंग झाले होते. मात्र काही लोकांच्या मदतीने प्रकरण निवळल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ashish Shelar on Uddhav Thackeray : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, आशिष शेलारांचे इलेक्शन कमिशनला पत्र