Raosaheb Danve on Uddhav Thackeray : शिवसेनेचा 58 व्या वर्धापन दिनानिमित्त (Shiv Sena Vardhapan Din) दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत बुधवारी पार पडले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा मेळावा वरळीमधील डोममध्ये झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली.
विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) प्रचार आत्तापासून सुरु करा, असे आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे, बहुतेक ही आता देशी ब्रांडी झाली आहे, अशी टीका केली. आता यावर भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लोकांना आता ठोस कामं हवी, करमणूक नकोय : रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे म्हणाले की, काल जो काही मेळावा झाला त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या परीने वर्धापन दिन साजरा केला. एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या बाजूवर भर दिला. तर उद्धव ठाकरेंनी आनंद साजरा केला आणि मोदीजींवर टीका केली. आता ती टीका ऐकून लोकं कंटाळली आहेत. ब्रँड संपला वगैरे ही भाषा यांच्यासाठी असून आमच्यासाठी नाही. त्यांचे 12 वाजले आहेत. लोकांना आता ठोस कामं हवी आहेत. करमणूक नको आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जागा वाटपासंदर्भात कुठलाही वाद नाही : रावसाहेब दानवे
आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) लोकसभा निवाद्नुकीसारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जागावाटपाची बोलणी करायला मला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे घेऊन चला. मोदी-शाहांकडून विधानसभा निवडणुकीसाठी 100 जागा मागा, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात केले. रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत विधानसभेच्या जागावाटपावरून बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे.याबाबत रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपासंदर्भात आमच्यात कुठलाही वाद नाही. सगळे नेते एकत्र बसतील. अडचण न येता आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोर जाऊ, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा