Deepak Kesarkar on Narayan Rane : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'नारायण राणे (Narayan Rane) यांनी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता. भाजपचं व्यासपीठ वापरून राणे पिता-पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नारायणे राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंची बदनामी केली. याबाबत पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्यासोबत संपर्क केला. मी पंतप्रधानांना याबाबत वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याचं दिसून आलं. हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरु झाला. यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव यांची भेट झाली.'


दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात राणेंनी अनेक पत्रकार परिषद घेतल्या. यावेळी भाजप नेत्यांचाही राणेंच्या भूमिकेला आणि आदित्य ठाकरेंच्या बदनामीला विरोध होता. मी नरेंद्र मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या. यावर ठाकरे घराण्याबद्दल प्रेम आणि आदर असल्याची प्रतिक्रिया दिली.'


शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तयारी होती, पण नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट दिपक केसरकरांनी केला आहे. आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करायचं ठरवलं होतं, असंही केसरकरांनी सांगितलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर आमदार कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरु होते.


'भाजप आणि शिवसेनेत बोलणी सुरु असताना भाजपच्या 12 आमदाराचं निलंबन झालं. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले. यानंतर नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. यावर उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे अनेक शिवसेना कार्यकर्तेही नाराज झाले. राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची बदनामी केली. भाजप आणि शिवसेनेतील संबंध सुधारण्याची उद्धव ठाकरेंची तयारी होती. पण नंतरच्या काळात वेळेअभावी ते झालं नाही आणि संबंध आणखी बिघडले', असं केसरकरांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या