Ranajagjitsinha Patil on Omprakash Rajenimbalkar, Dharashiv Loksabha : उस्मानाबादच्या पाटील-निंबाळकर घराण्याचा वाद महाराष्ट्राला आता नवा राहिलेला नाही. आता आणखी एकदा दोन्ही कुटुंबामध्ये ठिणगी पडलीये. कारण धाराशिव लोकसभेतून पुन्हा एकदा दोन्ही कुटुंब आमने-सामने आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अर्चना पाटील यांना उमेदवारी दिलीये. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackerya) ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलय. 


राणा पाटलांकडून ओमराजेंचा 'बाळ' म्हणून उल्लेख


ओमराजे निंबाळकर यांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटील ,  राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या घराणेशाहीचा पाढा वाचून दाखवल्यानंतर पाटील कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजेंना जशास तस उत्तर दिलय. राणा पाटलांनी ओमराजेंचा "बाळ" म्हणून उल्लेख केलाय. तर राणा जगजितसिंह याचे पुत्र मल्हार पाटील यांनी उद्धव ठाकरेंची घराणेशाही कशी चालते? असा सवाल केलाय. 


राणा पाटील काय म्हणाले?


ओमराजे यांच्यावर टीका करताना राणा पाटील म्हणाले, खासदाराने केंद्राकडून मोठा निधी आणायचा असतो. आपल्या भागातील विषय मार्गी लावायचे असतात.  एकतरी काम संबंधित व्यक्तीकडून झाले का? जॅक, टोमी वगैरे ठीक आहे. बार्शी आणि ढोकी फार लांब नाही. त्यामुळे बाळ किती गुणी आहे? हे मी तुम्हाला वेगळ सांगण्याची गरज नाही. आणि गुणी बाळाचं काय करायच हे देखील मला सांगण्याची आवश्यकता नाही.


लोक यांना एकदाच निवडून देतात, मल्हार पाटलांचा हल्लाबोल 


याची खासियत आहे. लोक यांना एकदाच निवडून देतात नंतर पाडतात. एवढी यांना मस्ती आहे. आमची घराणेशाही काढतात. यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यानी स्वतः च्या मुलाला कॅबिनेट मैत्री केल होतं. 2008 मध्ये तेरणा कारखान्याचा चेअरमन कोणाला केल? डीडीसी बॅंकेच्या निवडणुकीत याला मामाचं नाव सुचल, असे राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील म्हणाले आहेत. 


ओमराजे काय म्हणाल होते? 


ओमराजेंनी बार्शीत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात पाटील कुटुंबियांवर चौफेर टीका केली होती. पद्मसिंह पाटीलांनी 40 वर्षे मंत्रिपद उपभोगले. राणा पाटलांना तर वर्गात कोणी मॉनिटरही केलं नसतं.  पण शरद पवारांनी यांना मंत्री केलं. यांना एकूण 45 वर्ष मंत्रीपद मिळालं. एवढे वर्ष जिल्ह्याचे नेतृत्व केलं,  यांनी साध्य काय केल? धाराशिव जिल्हा दारिद्र्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला. पद्मसिंह पाटील यांनी 2009 मध्ये श्रीमंत खासदारांपैकी क्रमांक 3 चे खासदार होते, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Omraje nimbalkar on Malhar Patil : रक्तात राष्ट्रवादी, ह्रदयात भाजप आहे, आता किडनीत शिंदे गट टाक, ओमराजेंचा मल्हार पाटलांवर हल्लाबोल