Gajanan Kirtikar vs Ramdas Kadam: रामदास कदमांचे आरोप मान्य नाहीत, असं म्हणत खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते आरोप करतात म्हणून प्रति आरोप करणं मला मान्य नाही. मी माझ्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे माझी बाजू मांडली आहे, असं म्हणत गजानन कीर्तीकरांनी रामदास कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर देणंही टाळलं आहे. तसेच, माझ्यासाठी विषय संपला असंही कीर्तीकरांनी आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम दिला आहे.
रामदास कदमांनी केलेल्या वादाबाबत गजानन कीर्तीकरांनी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. गजानन कीर्तीकर म्हणाले की, "रामदास कदमांचे आरोप मान्य नाही. ते आरोप करतात म्हणून प्रति आरोप करणं मला मान्य नाही. मी माझ्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे माझी बाजू मांडली आहे. आम्ही ज्येष्ठ आहोत. आम्ही असे वागलो, तर खालच्या शिवसैनिकांकडे चांगला मेसेज जाणार नाही."
"मुख्यमंत्र्यानी आम्हाला दोघांना बसवलं तर भूमिका मांडेन, माझ्यासाठी विषय संपलाय. माझ्याकडून मी पडदा टाकलाय. मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन त्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. मी माझी भूमिका काल स्पष्ट केली आहे. मी मला जे काही सांगायचे होतं ते मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. मला बोलवलं तर आम्ही तिघे एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढू.", असंही गजानन कीर्तीकर म्हणाले आहेत.
कीर्तीकर-कदम वाद काय?
गजानन कीर्तीकर हे मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. रामदास कदम यांनी या मतदारसंघावर मुलासाठी दावा केला आहे. गजानन कीर्तीकर यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून लढू नये. कीर्तीकर हे पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, असेही त्यांनी म्हटले होते. गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे सध्या ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाकडून संभाव्यत: तेच उमेदवार आहेत. तर, रामदास कदम सिद्धेश कदमसाठी आग्रही आहेत. यावरुन दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत.
पाहा व्हिडीओ : Gajanan Kirtikar : Ramdas Kadam यांच्या 'त्या' आरोपांवर गजानन कीर्तीकरांची पहिली प्रतिक्रिया
महत्त्वाच्या इतर बातम्या :