मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena) दोन ज्येष्ठ आणि बडे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्यातील वादाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. रामदास कदमांनी पुन्हा एकदा गजनान किर्तीकरांचे 'वस्त्रहरण' केलं. गजानान कीर्तीकर यांनी आपल्या बायकोशी गद्दारी केली आहे, पुण्याला काय करायला जाता?  पुण्यात शेण खायला का जाता?, असं म्हणत रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांची पर्सनल लाईफ काढली. एबीपी माझाशी बोलताना रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकरांवर स्फोटक आरोप केले. 


तुमचं वस्रहरण केलं तर तुम्हाला महिला मतं देणार नाहीत. महिला तुम्हाला चपलेने मारतील. पुण्यात काय आहे हे जर सांगितलं तर गजनान कीर्तीकरांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 6 वाजता भेटायला जाणार आहे, रामदास कदम म्हणाले. 


मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन राडा 


मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटात वाद आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आणि नेते रामदास कदम हे दोघेही इरेला पेटले आहेत. गजानन कीर्तीकर यांनी रामदास कदम यांच्या विरोधात पत्र काढून मोठे आरोप केले होते. तसंच रामदास कदम खरे गद्दार असल्याचं म्हटलं होतं. 


कीर्तीकर-कदम वाद काय?


गजानन कीर्तीकर हे मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. रामदास कदम यांनी या मतदारसंघावर मुलासाठी दावा केला आहे. गजानन कीर्तीकर यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून लढू नये. कीर्तीकर हे पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, असेही त्यांनी म्हटले होते. गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे सध्या ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाकडून संभाव्यत: तेच उमेदवार  आहेत. तर, रामदास कदम सिद्धेश कदमसाठी आग्रही आहेत. यावरुन दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत.   


VIDEO :  रामदास कदम नेमकं काय म्हणाले?



 


संबंधित बातम्या  


Ramdas Kadam and Gajanan Kirtikar : ऐन दिवाळीत शिंदे गटात शिमगा; गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ, रामदास कदम-गजानन कीर्तीकर वादाने टोक गाठलं!