Ramdas Athawale : लोकसभा निवडणुकीची निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे इतर एनडीएतील सहकारी पक्षांच्या पाठिंबा घेत सरकार स्थापन करावे लागणार आहे. दरम्यान, एनडीएतील घटक पक्षांनी भाजपकडे आपल्या मागण्यांची यादी वाचण्यास सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही मागणी करताना आखडता हात घेतलेला नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपकडे काही मागण्या केल्या आहेत. 


काय म्हणाले रामदास आठवले ?


"महाराष्ट्रात मी एकही जागा न मागता फुल्ल सपोर्ट केला. यावेळी मला कॅबिनेट मंत्री मिळाले पाहिजे. त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले तर अतिशय चांगली गोष्ट आहे", असे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सध्या सरकारही बनलेले नाही. मात्र, मंत्रिपदावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणते मंत्रालय हवे? यावरुनही मागण्या केल्या जाऊ लागल्या आहेत. एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षाकडे सध्या 240 सीट आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीकडे 16, नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे 12 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 7 जागा आहेत. शिवाय लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) कडे 5 जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापन केल्यानंतर कोणाला किती जागा मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल


भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8


मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅटट्रीक


लोकसभा निवडणुकीत एनडीएने (NDA) 292 जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडला आहे, त्यामुळे ते लगेचच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला. नरेंद्र मोदी सध्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत. दरम्यान, मोदींचा पंतप्रधान पदासाठीचा हा तिसरा शपथविधी सोहळा आहे. त्यामुळे, मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅटट्रीक होत आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Kangana Ranaut slapped Case : कंगनाला रणौतला कानशिलात लावणारी CISF जवान अखेर समोर; म्हणाली, 'माझी आई आंदोलनाला'