Kangana Ranaut slapped Case : अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) चंदीगढ विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या CISF च्या महिला जवानाचे निलंबन करण्यात आले होते. अखेर महिला जवानाने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. "माझी आई आंदोलनासाठी बसली होती, तेव्हा हिने शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केली होती", असं कंगनाला रणौतला कानशिलात लावणारी CISF जवान म्हणाली आहे. 






मला आता पंजाबमध्ये वाढणाऱ्या आंतकवादाबद्दल चिंता वाटते : कंगना रणौत 


नमस्कार मित्रांनो, मला फार फोन कॉल येत आहेत. शुभचिंतक आणि मीडियातील लोक माझ्यासी संपर्क करत आहेत. सर्वांत पहिल्यांदा सांगते की, मी सुरक्षित आहेत. आज जो प्रसंग  झाला.  तो सेक्युरिटी चेक जवळ झाला. मी तिथून जात असताना दुसऱ्या कॅबिनमधील एक महिला होती जी सीआयएसएफची सुरक्षा कर्मचारी होती. तिने मला क्रॉस करण्याची वाट पाहिली. त्यानंतर ती माझ्यासमोर आली आणि माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर मला ती शिव्या देखील देत होती. मी तिला विचारले की, तिनं असं का केलं? तेव्हा तिने सांगितलं की, मी शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करते. मला आता पंजाबमध्ये वाढणाऱ्या आंतकवादाबद्दल चिंता वाटू लागली आहे, असं कंगणा रणौतने (Kangana Ranaut) म्हटलं आहे. 






कंगणा रणौतला कानशिलात लगावल्याने CISF मधून निलंबन 


अभिनेत्री आणि मंडी लोकसभेची खासदार कंगना रणौत हिला कानशिलात लगावणे CISF महिला जवानाला चांगलेच महागात पडले आहे. CISF मधून तिचे निलंबन करण्यात आले. चंदीगड विमानतळावर भाजप नेत्या आणि अभिनेत्री कंगना राणौतला थप्पड मारल्याप्रकरणी सीआयएसएफने महिला जवानाला निलंबित केले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली असल्याचे सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Kangana Ranaut slapped : कंगनाला रणौतला कानशिलात लगावणे महागात पडले, CISF महिला जवानाचे निलंबन