Raju Shetti on Vilasrao Deshmukh, Nashik : “विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) मुख्यमंत्री असताना मी आमदार होतो. मुंबईमध्ये दुध आणण्यासाठी गुजरातला गेले होते. गुजरातवरुन येणारे दुधाचे टँकर आम्ही अडवले होते. त्यावेळी विलासराव देशमुख अमेरिकेत होते. विलासरावांचे अमरिकेवरुन रात्री दोन वाजता फोन आले होते. अमिरिकेत असून सुद्धा विलासराव देशमुखांनी फोन केले होते. त्यानंतर आर.आर.पाटील यांच्यासोबत माझी बैठक झाली होती. त्यानंतर विलासरावांनी मला दिलेला शब्द पाळला होता”, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते. नाशिकमध्ये बोलत असताना शेट्टींनी जुन्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. 


 त्यावेळी मी माझ्या खासदारकीचा उपयोग केला


राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले, दरम्यानच्या काळात गुजरातचे पोलीस आम्हाला अटक करण्यासाठी आले होते. मी म्हणालो, मला अटक करा ठीक आहे,संसदेच्या अधिवेशन चालू आहे. कायदा वाचून बघा. आता अधिवेशन चालू आहे. त्यावेळी मी माझ्या खासदारकीचा उपयोग केला. मी रेल्वे रोडवर जाऊन बसलो. मला मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला.  त्यांना त्यावेळी दुधाला पाच रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो,अशी घोषणा करावी लागली, असंही राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितलं. 


बाहेरच्या राज्यातून 21 लाख लिटर दूध महाराष्ट्रात येतं


पुढे बोलताना राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले, एक लिटरला अनुदान देण्याची पद्धत त्यावेळी सुरू झाली. यावर्षी बजेटमध्ये अजित पवार यांनी घोषणा केली. मात्र अनेक निकष लावले जातात. अनुदानातून किती लोकांना बाजूला करण्यात येईल यासाठी प्रयत्न केले जाते. आज सुद्धा विधान परिषदेमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषणा केली. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा अधिकार सुरू होणार म्हणून सरकार घाबरले. आमच्याकडे आजही दुधाला तीस रुपये लिटरला मिळतात. बाहेरच्या राज्यातून पावडर आणि त्याचे दूध केलं जात, तर शेतकऱ्यांनी कसे करायचे. बाहेरच्या राज्यातून 21 लाख लिटर दूध महाराष्ट्रात येतय. गुजरात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात दुध येत आहे. वन नेशन एकच मार्केट ही संकल्पना आपण स्वीकारली आहे. काही लोक म्हणतात आपण दूध आयोग ठरवावा. वेगवेगळे पिकाचा हमीभाव कृषी मूल्य आयोग ठरवतो. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Narendra Modi on Congress : 2014 नंतरचा भारत घरात घुसून मारतो, आधीचं सरकार गप्प राहायचं ; पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल