Rajni Satav passed awaay : माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेड येथील खासगी रुग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी (दि.18) प्रकृती अस्वस्थ असल्याने नांदेड येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रजनी सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आई आणि विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्या त्या सासू आहेत. रजनी सातव यांनी राज्याचे आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषविले होते. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील होत्या.






काँग्रेसमध्ये गेल्या 40 वर्षांपासून सक्रिय 


राज्यमंत्री राहिलेल्या रजनी सातव यांनी एकदा विधानसभेत तर एकदा विधानपरिषदेतून नेतृत्व केलं होतं. काँग्रेसच्या प्रदेश संघटनेतही त्या अनेक वर्ष सक्रिय होत्या. सातव कुटुंबिय गेल्या 43 वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहे. सध्या त्यांची सून आमदार आहे. गांधी घरण्याचे निकटवर्तीय, अशी सातव कुटुंबियांची ओळख आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या 


Former Chief Ministers join BJP : अशोक चव्हाण ते अमरिंदर सिंग, आता कमलनाथ यांची चर्चा; काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद भूषवलेले किती नेते भाजपच्या गळाला?