Rajesh Tope Networth : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गुरुवारी (दि.25) 45 उमेजवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नावाचा देखील समावेश आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राजेश टोपे यांना पुन्हा एकदा घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. गेल्यावेळी राजेश टोपे यांनी केवळ 2 हजार मतांनी विजय मिळवला होता.
राजेश टोपे घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मैदानात
जालन्यातील घनसावंगी मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी गुरुवारी (दि.25) उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञा पत्रामध्ये राजेश टोपे यांनी आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार राजेश टोपे यांच्याकडे बँक डिपॉझिट, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि सोन्या चांदीसह एकूण 50 कोटी 94 लाख 80 हजार 610 रुपयांची मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या पत्नी मनीषा टोपे यांच्या नावावर 4 कोटी 58 लाख 16 हजार रुपयांची संपत्ती आहे.
राजेश टोपेंच्या संपूर्ण संपत्तीची माहिती जशीच्या तशी
राजेश टोपे यांच्या नावावर असलेली शेतजमीन व्यावसायिक बांधकामाचे आजचे बाजार मूल्य 65 कोटी 90 लाख 41 हजार 353 एवढ आहे..
राजेश टोपे यांच्याकडे 12 लाख 50 हजार 556 रुपयांची रोख असून त्यांच्या पत्नी मनीषा टोपे यांच्या कडे 7 लाख 84 हजारांची रोख आहे.
राजेश टोपे यांच्याकडे एक फॉर्च्युनर गाडी, 4 ट्रॅक्टर दोन ट्रेलर आणि एक ट्रक अशी वाहने आहेत.
राजेश टोपे आणि त्यांच्या पत्नी कडे एकुण 3 किलो 732 ग्रॅम एवढे सोन असून, 3 किलो 225 ग्रॅम चांदी त्यांच्या कडे आहे.
विशेष म्हणजे राजेश टोपे यांच्यावर 4 कोटी 2 लाख 47 हजारांचे, तर त्यांच्या पत्नी मनीषा टोपे यांच्या वर 4 कोटी 99 लाख 41 हजारांचे कर्ज आहे..
राजेश टोपे यांचे वार्षिक उत्पन्न 3 कोटी 3 लाख दोन हजार एवढे दाखवण्यात आले असून मनीषा टोपे यांचे 42 लाख 80 हजार 423 रुपये एवढे वार्षिक उत्पन्न ...
अर्जुन खोतकर यांची मालमत्ता दोन कोटी 47 लाखांची
जालना विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ज्यामध्ये खोतकर यांच्या संपत्ती मध्ये वाढ झाल्याचं दर्शवण्यात आलाय, खोतकर यांच्या नावावर 2 कोटी 47 लाख 79 हजार 295 किमतीची जंगम मालमत्ता आहे, तसेच त्यांच्या पत्नी सीमा खोतकर यांच्या नावावर 89 लाख 23 हजार 677 रुपयांची मालमत्ता आहे.
अर्जुन खोतकर यांच्याजवळ वारसा हक्काने आलेले शेतजमी घर अशी एकूण 1 कोटी 9 लाख 82 हजार 400 रुपयाची मालमत्ता आहे त्यांनी व्यावसायिक क्षेत्र विकसित केलेल्या मालमत्तेचे बाजार मूल्य 7 कोटी 74 लाख 59 हजार 622 एवढं आहे,यांच्या पत्नी सौ सीमा खोतकर यांच्याकडे विकसीत केलेल्या संपत्तीचे एकूण बाजारमूल्य 3 कोटी 20 लाख 93 हजार रुपये एवढं आहे. अर्जुन खोतकर यांच्या कडे 2 तोळे सोने, आणि त्यांच्या पत्नी सीमा खोतकर यांच्या कडे 70 तोळे सोने आहे. विशेष म्हणजे अर्जुन खोतकर यांच्या नावावर 1 कोटी 2 लाख 6 हजार रुपयाचं कर्ज आहे. तसेच त्यांच्या नावावर एकही गाडी नाही. 2023-24 या आर्थिक वर्षात अर्जुन खोतकर यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख सहा हजार तर त्यांच्या पत्नी सीमा खोतकर यांचं चार लाख 75 हजार 330 रुपये दर्शवण्यात आलय.
इतर महत्त्वाच्या बातम्या