Rajendra Raut on Manoj Jarange : "मनोज जरांगे पाटलांना कोणी काही बोललं की लगेच ते लगेच याच्याकडून सुपारी मिळाली त्याच्याकडून मिळाली असं बोलतात. मग आम्ही त्यांना असं बोलल्यानंतर त्यांना राग येतो. मनोज जरांगेना कोणाची सुपारी मिळाली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात?", असा सवाल बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना केलाय. ते बार्शीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


सहा कोटी मराठा समाजाला दुखावण्याचा धाडस कोणामध्येच नाही


राजेंद्र राऊत म्हणाले, शिंदे -फडणवीस- अजितदादा यापैकी कोणाचीही चूक दाखवा आम्ही त्यांना बोलू. शंभर- पन्नास मतं असलेल्या समाजाला देखील कोणी दुखवत नाही. मग सहा कोटी मराठा समाजाला दुखावण्याचा धाडस कोणामध्येच नाही. औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलेला मराठा समाज आहे. त्यामुळे सत्ताधारी ते कसं करतील. मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनामुळे लोकसभेत विरोधकांना झुकतं माप गेले; आता जरांगे यांची जबाबदारी की विरोधकांकडून त्यांनी ओबीसीतून आरक्षणाबाबत मागावे, असंही राजेंद्र राऊत म्हणाले. 


मराठ्याचा आमदार पाडून सोपलाला निवडून आणायचा विचार जरांगे पाटलांनी केलाय का?


पुढे बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले, मराठ्याचा आमदार पाडून दिलीप सोपलाला निवडून आणायचा विचार मनोज जरांगे पाटलांनी केलाय का? मनोज जरांगेना कोणाची सुपारी मिळाली? सह्याद्री अतिथी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ओबीसीचा विषय न काढता मराठा आरक्षण द्यायचे. मात्र मनोज जरांगे पाटील यांचा त्यांचा आधीचा मुद्दा सगेसोयऱ्याचा होता. मात्र त्यानंतर ओबीसीचा मुद्दा त्यांनी काढला. मात्र विरोधी पक्षाचे नेते ओबीसीतून आरक्षण सोडून बोला असे सातत्याने बोलत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ज्याप्रमाणे ओबीसीतून मागणी करतात त्याप्रमाणे विरोधकांकडे करावी. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनामुळे लोकसभेत विरोधकांना झुकतं माप गेले.मग आता जरांगे यांची जबाबदारी आहे की विरोधकांकडून त्यांनी ओबीसीतून आरक्षणाबाबत मागणी करावी. जर विरोधकांनी याबाबत लिहून दिलं तर आमचा विषय संपला.


1985 सालापासून माझं घराणं दिलीप सोपल यांच्याविरोधात लढतय.  माझ्या वडिलांनी बाबुराव वाडेगावकरांचा प्रचार केला, मी किसन आबा, प्रभाताई यांचा प्रचार केला आणि सोपलांच्या प्रत्येक निवडणुकीत विरोध केला. सोपल आणि आमचा विरोध पाचवीला पूजलाय त्यामुळे जरांगेंना सांगून मला काय फायदा होणार? तुमच्या सांगण्याने सोपल मला काय मिठ्या मारणार आहे का? असा सवालही राजेंद्र राऊत यांनी केला. 


मनोजदादाला सोपलांचे समर्थक जाऊन सातत्याने भेटतायेत 


मनोजदादाला सोपलांचे समर्थक जाऊन सातत्याने भेटतायेत आणि माझ्या विरोधात सांगतात. त्यामुळे मराठ्याचा आमदार पाडायचा आणि सोपलाला निवडून आणायचं असा विचार मनोज जरांगे पाटलांनी केलाय का. मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारल्यामुळे त्यांनी चिडू नये कारण ते सहा कोटी समाजाचे नेतृत्व करत आहेत. सार्वजनिक जीवनात काम करताना आपण मालक राहिलेलं नसतो जनता मालक असते, असंही राऊत म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Prasad Lad : मराठे एकदिवस मनोज जरांगे पाटलांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत, प्रसाद लाड यांची जहरी टीका