पुणे : लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackray) आज पुण्यात सभा घेत आहेत.पुण्यातील सारसबाग परिसरात ही सभा होत असून पावसाचे सावट असल्यामुळे आजची सभा होईल की नाही, असा संभ्रम होता. मात्र, पावसाने दडी मारल्यानंतर नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने राज ठाकरेंची सभा सुरू झाली. अवकाळी पावसामुळे (Rain) अनेक ठिकाणी सभा रद्द झाल्या, पण तुमच्या साक्षीने भव्य सभा पुण्यात (Pune) होत आहे. पाऊस पडला तर राम तेरी गंगा मैलीचा सीन नको व्हायला, असे म्हणत राज ठाकरेंनी मिश्कील टोला लगावला. 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी ही सभा होत आहे, मी यापूर्वी एका मुलाखतीत म्हटलं होतं की


पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. त्यानंतर, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची ही दुसरी सभा आहे. या अगोदर नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत सभा झाल्यानंतर ते पुण्यामध्ये बोलत आहेत. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी राजकीय इतिहास सांगत शरद पवारांना लक्ष्य केलं. विदेशी बाई म्हणून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, असे म्हटले. तर, 2014 व 2019 च्या निवडणुकांवेळीही काहीतरी विषय होते. मात्र, ही पहिली निवडणूक आहे, ज्याला विषयच नाही. त्यामुळे, भाषणांमध्ये सभांमध्ये शिवराळ भाषा पाहायला मिळत आहे. मी ही सभा का घेत आहे, तर पुणे हे विद्ववानांचं शहर आहे, तरुणाईचं शहर आहे, मोठा संस्कृती वारसांचं हे शहर आहे. जगभरातील अनेक कंपन्यांना या शहराने विद्वान दिले आहेत. त्यामुळे, अशा एका पुणे शहरात, पुन्हा सत्तेत बसणाऱ्या पक्षाची उमेदवारी मुरलीधर यांना मिळाली आहे, म्हणून मी आज पुण्यात सभा घेत आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले.  


राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :- 


सध्या आपल्या सभोवतालचं वातावरण न आवडल्यामुळे युवा परदेशात जात आहेत.


त्यामुळे, आपल्या सभोवतालचं वातावरण चांगलं करणं ही आपली जबाबदारी आहे.


नियोजन शून्य रचनेमुळे शहर बर्बाद होत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून शहर वाचवत नसतील. 


नोकऱ्या आणि शिक्षणाची राजधानी पुणे आहे, तरी तरुण शिक्षणासाठी बाहेर का जात आहेत असा प्रश्न निर्माण होतो .


आपल्या इथल्या वातावरणामुळे तरुण देशाच्या बाहेर जात आहेत


आमदार खासदार यांची जबाबदारी आहे की वातावरण चांगलं करणे .


मुंबई शहर बरबाद व्हायला काळ गेला 


पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही


शहराचं नियोजन नाही 


पुणे महानगरपालिका शहराची लोकसंख्या 70 लाख आणि वाहनं 72 लाख, कुठून रस्ता मिळणार पुणेकरांना 


प्रत्येक शहराची मानसिकता असते 
 
पटकन जाऊन येतो म्हणत पुणेकर कीक मारुन गाडी काढून निघतात 


15 टक्के रस्ते लागतात एका शहराला.


30 लाख लोक पुण्याबाहेरून पुण्यात आले


पुण्यात सगळ्यात जास्त विद्यापीठ आहे 12 डीम, 3 स्वायत्त विद्यापीठ, 8 मेडिकल कॉलेज, IT ऑफिस आहेत 


75 ते 80 हजार कोटी कर पुणेकर भरतो.


राजकीय फटकेबाजी


अजित पवार या माणसाने जातीच राजकारण नाही केला, शरद पवारांसोबत राहून त्यांनी जाती पातीच राजकारण केलं नाही


मतदान करा म्हणून मशिदींमधले मौलवी फतवे काढत असतील आज हिंदू म्हणून सांगतो. मुलीधर मोहोळ आणि शिंदे-अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करा