एक्स्प्लोर

Raj Thackeray Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Mumbai Morcha: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचा आज मुंबईत मोर्चा; मागण्या काय, कोण कोण उपस्थित राहणार?, A टू Z माहिती

Raj Thackeray Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Mumbai Morcha: मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Mumbai Morcha मुंबई: मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज (1 नोव्हेंबर) एल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत (Mahavikas Aghadi Mumbai Morcha) आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असणार आहेत. आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात येत आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मोर्चा दुपारी 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल.

महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंची मनसेही (Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha) सहभागी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज स्वतः मोर्चात चालणार आहेत. दादरहून सीएसएमटीकडे ते लोकलने प्रवास करणार आहेत. मोर्चाची वातावरण निर्मिती म्हणून राज ठाकरेंनी नुकताच रंगशारदा सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेत मतदारयंत्र, मतदार याद्यांसंदर्भात प्रेझेन्टेशनही केलं होतं. तसंच मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं होतं. 

विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय? (What are the demands?)

1. मतदारयाद्या अद्ययावत करा

2. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा

3. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा

4. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा

कसा असेल मोर्चाचा मार्ग? (Raj Thackeray Uddhav Thackeray Morcha Route)

दुपारी एक वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघेल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल.
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील.
ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात शेकाप जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील.
राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात हा मोर्चा असणार आहे... मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात येतोय.
राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केला जात नाहीत आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मतावर विरोधक ठाम राहणार.
या मोर्चानंतर हा मुद्दा अधिक आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी उद्या सर्व पक्षांची मिळून अधिकृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती आहे.

मोर्चात कोण कोण उपस्थित राहणार? पाहा यादी- (Who will be present at the morcha?)

शरद पवार, राष्ट्रवादी(शप)
उद्धव ठाकरे, शिवसेना(उबाठा)
राज ठाकरे, मनसे
विजय वडेट्टीवार,काँग्रेस
बाळासाहेब थोरात,काँग्रेस
सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी(शप)
जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादी(शप)
जयंत पाटील,राष्ट्रवादी(शप)
रोहित पवार,राष्ट्रवादी(शप)
शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी(शप)
आदित्य ठाकरे,शिवसेना(उबाठा)
बाळा नांदगावकर, मनसे
जयंत पाटील, शेकाप
प्रकाश रेड्डी, भाकप
अनिल परब,शिवसेना(उबाठा)
अनिल देसाई, शिवसेना(उबाठा)
अरविंद सावंत, शिवसेना(उबाठा)
राजन विचारे , शिवसेना(उबाठा)
सचिन अहिर , शिवसेना(उबाठा)
अंबादास दानवे, शिवसेना(उबाठा)
सुनील प्रभू, शिवसेना(उबाठा)
सुनील शिंदे, शिवसेना(उबाठा)
अविनाश अभ्यंकर, मनसे
नितीन सरदेसाई, मनसे
संदीप देशपांडे, मनसे
अविनाश जाधव,मनसे
नसीम खान, काँग्रेस
सचिन सावंत, काँग्रेस
अमीन पटेल, काँग्रेस

हर्षवर्धन सपकाळ आणि माजी नाना पटोलेंनी राखलं अंतर- (Mahavikas Aghadi Morcha)

आयोगाच्याविरोधात मुंबईत विरोधकांची एकजूट होत असली तरी या मोर्चापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मात्र अंतरच राखलंय. त्याशिवाय या मोर्चाला मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडही येण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती आहे. या तीन बड्या नेत्यांव्यतिरिक्त काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान हे नेते उपस्थित राहणार आहेत. मनसेच्या मविआतील समावेशाबाबत काँग्रेसमध्ये आधीपासूनच विरोधी सूर उमटत आहेत. मनसेसोबत मोर्चात खांद्याला खांदा लावून चालल्यास बिहार निवडणुकीत काँग्रेसला फटका बसू शकतो असे आडाखे बांधले जात आहेत.  

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

MNS Morcha : निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार? मतदानावर बहिष्कारासह तीन-चार पर्यायांवर चर्चा, दोन दिवसात निर्णय होणार

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report
BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
BMC Election Results 2026: बीएमसीतील सत्ता गेली पण ठाकरेंचा मुंबईतील पाया भक्कम, मराठी माणूस पाठीशी उभा राहिला
ठाकरे हरले पण संपले नाहीत, मुंबईच्या मराठी पट्ट्यातील जनतेकडून भरभरुन मतदान अन् 71 नगरसेवक विजय
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
KDMC Election Results 2026: कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात? ठाकरेंच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावणार? श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात? ठाकरेंच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावणार? श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
Embed widget