Raj Thackeray Meeting in Pune : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पीएम नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) महायुतीला पाठिंबा दिलाय. त्यानंतर भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे (Ratnagiri-Sindhudurg) उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज ठाकरेंना सभेसाठी विनंती केली होती. राज ठाकरे यांनी नारायण राणेंचा विनंतीला मान देत कणकवली येथे सभा घेतली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत राज ठाकरेंनी नारायण राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान, राज ठाकरे आता भाजपसाठी सभांचा धडाका लावणार आहेत. पुण्यातही राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे.
कोठे आणि कधी होणार सभा?
पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने पुण्याचे माजी महापौर असलेल्या मुरलीधर मोहोळ (Muralildhar Mohol) यांना मैदानात उतरवले आहे. शिवाय, पुण्यात राज ठाकरेंची साथ सोडत वंचितकडून उमेदवारी मिळवलेले वसंत मोरेही (Vasant More) रिंगणात आहेत. अशातच मुरलीधर मोहोळ (Muralildhar Mohol) यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. येत्या 10 तारखेला राज ठाकरेंची सभा होईल. पुण्यात नदी पात्रात राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे. कणकवलीनंतर राज ठाकरेंची पुण्यात होणार सभा होणार आहे.
राणेंसाठी घेतलेल्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये नारायण राणेंसाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी नारायण राणेंना मतदान करण्याचे आवाहन केले. तर उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केला. कोकणातील धंदे गुजरातला पळवले जात आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रकल्पाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. , "कोकणातले धंदे गुजरातला जात आहेत म्हणता. वा रे वा 2014 ते 2019 या काळात तुम्ही त्यांच्या सोबत होतात. तेव्हा त्यांना विरोध का केला नाही? कोकणात प्रकल्प आले तर स्फोट होईल म्हणणाऱ्या माहिती नाही का? की अॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत आहे. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार" असं राज ठाकरे म्हणाले होते. आता पुण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : पीएम मोदी आणि उद्धव ठाकरेंचा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव, पुढे काय होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले...