एक्स्प्लोर

Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज

Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे.

Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk Protest) यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती आता खालावात आहे. उपोषणामुळे त्यांचं वजन 8.9 किलोने कमी झालं आहे. सोनम वांगचुक 28 जूनपासून जंतरमंतरवर उपोषण करत आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली त्यांचं उपोषण सुरू आहे. नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हाव्यात, पेपरफुटीचा फटका बसलेल्या कुटुंबांना न्याय मिळाव्या या मागण्यांसाठी वांगचुक उपोषण करत आहेत. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलं आहे. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. वांगचुक यांच्या मागण्यात वावगं काहीच नाही. मंत्र्याला हाकला, परीक्षा पारदर्शक घ्या हीच तर मागणी आहे. भाजपला सध्या कोणी प्रश्न विचारु नये असा माज आहे. NEET च्या घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली, असंही राज ठाकरे म्हणाले. सोशल मीडियावर आज पोस्ट करत राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा 19 वा दिवस आहे. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की, सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार?, असं राज ठाकरे म्हणाले. ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest)

सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती- राज ठाकरे (Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest)

सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना 2018 साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात, असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे- राज ठाकरे (Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest)

आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता. निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

सदर प्रश्नात नरेंद्र मोदींनी लक्ष घालावे- राज ठाकरे (Raj Thackeray On Narendra Modi)

माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

कोण आहेत सोनम वांगचुक- (Who Is Sonam Wangchuk)

सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे लडाखमधील एक प्रसिद्ध भारतीय मेकॅनिकल इंजिनिअर, नवोन्मेषक, शिक्षण सुधारक आणि पर्यावरणवादी आहेत. ते प्रामुख्याने लडाखमधील शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक संचालक म्हणून ओळखले जातात. 2009 मधील 'थ्री इडियट्स' या सुपरहिट चित्रपटातील 'फुंसुक वांगडू' हे मुख्य पात्र सोनम वांगचुक यांच्याच खऱ्या आयुष्यावरून प्रेरित होते. वामान बदलामुळे शेतीसाठी होणाऱ्या पाण्याची टंचाई टाळण्यासाठी, त्यांनी हिवाळ्यात पाणी साठवणारे 'आइस स्तूप' (कृत्रिम बर्फाचे स्तूप) हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना 2016 मध्ये आशियातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 'रॅमन मॅगसेसे पुरस्काराने' (Ramon Magsaysay Award) सन्मानित करण्यात आले आहे.

सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंचा पाठिंबा, VIDEO:

संबंधित बातमी:

सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Sunetra Pawar and Congress: सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं, हर्षवर्धन सपकाळांची प्रेस सुरु असताना राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण काँग्रेसच्या कार्यालयात घुसले अन्...
सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं, हर्षवर्धन सपकाळांची प्रेस सुरु असताना राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण काँग्रेसच्या कार्यालयात घुसले अन्...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Embed widget