Raj Thackeray News : बाबरी मशीद (Babri Masjid) पाडण्याच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) कारसेवक म्हणून गेले होते. त्यावेळी त्यांनी पाडलेल्या मशिदीची वीट (Brick) सोबत आणली होती. 32 वर्ष त्यांनी ती वीट (Babri Masjid Brick) जपून ठेवली. मंदिर बांधून झाल्यावर ती वीट हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी केला होता. राम मंदिर बांधून झाले पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असलेल्या राज ठाकरे यांना बाबरीची वीट भेट दिल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.


32 वर्ष जपून ठेवली बाबरी मशिदीची वीट


6 डिसेंबर 1992 ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते, त्यामध्ये बाळा नांदगावकरही होते. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा त्यातून ही एक वीट बाळा नांदगावकरांनी आणली होती. त्यांनी दोन वीट आणल्या होत्या. एक त्यांच्या घरी आहे आणि ही एक वीट. वीटचे वजन बघून समजेल किती मजबूत आहे. तेव्हाचं कन्स्ट्रक्शन चांगलं होतं कारण तेव्हा कंत्राटं निघत नव्हती. हा बाबरी मशीद पाडली त्याचा पुरावा आहे. राम मंदिराच्या निर्माण कार्यातीलही एक वीट मला आणायची आहे, असंही त्यांनी सांगितलं.


पाहा व्हिडीओ : 32 वर्ष जपून ठेवलेली बाबरी मशीदीची वीट 



'राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात'


मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ''तो प्रसंग आठवला की, फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायच्या. 32 वर्षे झाली. राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात. 22 जानेवारीला राम मंदिर लोकांसाठी खुलं झालं आणि 23 तारखेला बाळासाहेबांचा जन्म दिवस आहे. त्यावेळी काय सुचलं माहिती नाही पण, मी बाबरीची वीटसोबत आणली होती. मी माजगावमध्ये कार्यालय बांधलं तेव्हा त्या कार्यालयाखाली वीट घातली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधवकडे आहे, असो हरकत नाही, तो माझा जुना सहकारी आहे.''


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Raj Thackeray PC : तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर!