Raj Thackeray PC नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. राज ठाकरेंनी गुरुवारी पदाधिकारी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत, गट तट विसरून कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. आजही पदाधिकारी बैठक घेणार आहेत. तसंच शिक्षक, मुख्याध्यापक, निवृत्तीनाथ मंदिर पदाधिकारी असा विविध क्षेत्रातील सदस्यांशी राज ठाकरे चर्चा करणार आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केलं.
राज ठाकरे यांना यावेळी संजय राऊतांच्या प्रतिक्रियेबाबत प्रश्न विचारला. राज ठाकरे जर मविआसोबत आले तर घेणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला, त्यावर संजय राऊत म्हणाले होते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते आले. यावर राज ठाकरे म्हणाले, यांच्याकडे कोण जाईल, मुळात आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील माहिती नाही. यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे? INDIA आघाडीत नितीश कुमारही होते, कुठे गेले? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली, शिर्डी, नगरचे पदाधिकारी येऊन गेलेत. पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होते आहे. कुठे का निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहेत, आम्हीही करतोय.
मी अयोध्येत जाणार आहे, गर्दी कमी झाल्यानंतर मी जाईन. अनेकवेळा मी तुम्हाला (पत्रकारांना) न सांगता गेलो आहे. काळाराम मंदिरातही दर्शनाला जाणार, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर भाष्य केलं. आताचे लवंडे कुठे जातील याचा पत्ता नाही. यांच्या महाविकास आघडीकडे कोण जाणार? असा सवाल राज ठाकरे यांनी केली.
नरेंद्र मोदीसारखा पंतप्रधान व्हावा अशी इच्छा आहे, असे म्हटले होते. आता अजूनपर्यंत चाचपणी सुरु आहे. मागच्या मनपा निवडणुकमध्ये मी व्हिडीओ नव्हते लावले तरीही मतदान नाही झाले, अशी खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.
मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी रागातून मतदान झालं होतं. यावेळी आता समाधानातून मतदान होतंय का हे बघावं लागेल, असं राज ठाकरे म्हणाले.
टोलला विरोध नाही, मात्र टोलचे पैसे कुठे जातात ते बघितलं पाहिजे. टोलचा पैसा पक्ष निधीसाठी वापरला जातो.
राम मंदिरामुळे भाजपला मतदान होईल असं नाही
प्रत्येक निवडणूक वेगळी असते, ठोकताळे मांडता येत नाही. 1992 ला बाबरी , बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर निवडणूक झाली होती. 2014 वेगळे कारण होते. आता राम मंदिर झाल्याचे समाधान आहे पण भाजपला मतदान करतील असे नाही
पक्षातील कार्यकर्त्यांना इंजेक्शन दिलं
आमचा कारभार उघडा आहे, त्यामुळे गटबाजी दिसून येते, निवडणूक आल्यावर इतर पक्षातील तडे दिसतील. मी काल इंजेक्शन दिले आहे, कितीमध्ये फरक पडतो ते बघू, असं राज ठाकरे म्हणाले.
मनोज जरांगेंचं आता उपोषण का?
मी मागेच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तेव्हा सांगितले होते असे होणार नाही.कोर्टात प्रकरणात जाणार कोणीतरी राजकीय दृष्टीने मोर्चे घेऊन येतात, मराठा बांधव जातात. मुख्यमंत्रीशी चर्चा केल्यानंतर विजय उत्सव साजरा केला आता का उपोषण करतात?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
मी जे बोलतो ते कडवट वाटते नंतर ते कळतं सत्य आहे.
माझा टोलला विरोध नाही. टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते, त्यावर विरोध, त्यामध्ये स्पष्टता नाही. विषय टोल नाही टोल वसुली आहे. पैसे भरून झाले की नाही हे कधी कळेल? मुंबई पुणे हायवेवर किती पैसे वसूल झाले? मुख्यमंत्र्यांना भेटून त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी ठेवणार आहे. पैसे टोलवाल्याच्या खिशात जात आहे. किंवा त्याच्या खिशातील पैसे राजकीय पक्षाच्या फंडात जाणार हे चालेल का?
खड्डे जर असतील तर टोल कशासाठी? कोकणचा रस्ता पूर्ण नाही तरी तिथे एक टोल. ट्रान्स हार्बर रोडवर चांगले कॅमेरे, मग टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे ? राज्य सरकार आणि खाजगी माणसाच्या खिशात पैसे जातात हे बघायला पाहिजे.
Raj Thackeray PC Nashik VIDEO : राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
संबंधित बातम्या