Raj Thackeray, कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर केली. तर ठाण्यातून अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. आत्तापर्यंत राज ठाकरेंनी महाराष्ट्र विधानसभेसाठी 9 उमेदवार जाहीर केले आहेत. 


राज ठाकरेंबाबत अपशब्द, मनसेकडून परप्रांतीय तरुणाला मारहाण 


दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर मनसे पदाधिकाऱ्यांकडून एका परप्रांतीय तरुणाला मारहाण केली आहे.  राज ठाकरे यांच्या बद्दल त्याने अपशब्द वापरले या कारणावरून त्याला मारहाण करण्यात आली आहे. कल्याण रोडवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मानपाडा पोलिसांना बोलावून वाहतूक शाखेच्या केबिनमध्ये तरुणाला ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर तरुण चांगलाच घाबरलेला पाहायला मिळाला. त्याने घाबरुन ट्रॅफिक पोलिसाला मिठी मारली. 








इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sanjay Shinde : फडणवीसांना घाबरता, विधानसभेत बोलले नाहीत; बाहेर आलं की आरक्षण भेटायला पाहिजे म्हणतात, मराठा तरुणांनी संजय शिंदेंना घेरले


Sandeep Naik : शरद पवारांचा पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का, गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित