Rahul Gandhi Nepal Private Visit : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोमवारी अचानक नेपाळला पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आज संध्याकाळी काठमांडूला रवाना झाले होते. एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ते नेपाळला गेल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी अचानक काठमांडूला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र नंतर ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वैयक्तिक भेट असल्याचे सांगण्यात आले. काठमांडू येथील मॅरियट हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. राहुल गांधी सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता विस्तारा एअरच्या विमानाने नेपाळसाठी रवाना झाले होते.


दरम्यान, राहुल गांधी नेपाळहून परतल्यानंतर 6 आणि 7 मे रोजी तेलंगणा दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान राहुल गांधी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठालाही भेट देणार आहेत. तसेच तेलंगणा काँग्रेस वारंगलमध्ये सुमारे 5 लाख समर्थकांसह राहुल गांधींच्या भव्य सभेची तयारी करत आहे.


उस्मानिया विद्यापीठाने दौऱ्याला परवानगी नाकारली 


विद्यापीठाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अराजकीय भेटीसाठी कॅम्पसला भेट देण्याची परवानगी नाकारली. याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी या कथित निर्णयामुळे तेलंगणात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, विद्यापीठाने कार्यक्रमाच्या आयोजकांना कार्यकारी समितीच्या कथित निर्णयाबाबत लेखी माहिती दिलेली नाही. याप्रकरणी काँग्रेसने तेलंगणा राष्ट्र समितीच्या राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचवेळी राहुल यांच्या भेटीसाठी विद्यापीठाला आदेश देण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेस नेत्यांनी रविवारी सांगितले की, त्यांनी 23 एप्रिल रोजी कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती आणि त्यांना सांगण्यात आले की हा कार्यक्रम अराजकीय असेल.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Power Crisis: रविवारी विजेची मागणी घटली, कोळशाचा पुरवठाही वाढला


WhatsApp ने भारतात 18 लाखांहून अधिक खाती केली बंद; जाणून घ्या काय आहे कारण


खुशखबर! कार खरेदीदारांना मिळणार स्वस्त कर्ज, 'या' बँकेने केले आपले व्याजदर कमी