Bank Of Baroda Car Loan: तुम्हीही कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने कार कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे, म्हणजेच आजपासून तुमचा ऑटो लोन EMI कमी झाला आहे. आता वाहनांसाठी लोन घेतल्यास किती व्याजदर द्यावे लागेल, हे आपण जाणून घेणार आहोत. 


25 बेसिस पॉइंटची कपात 


बँक ऑफ बडोदाने कार कर्जावरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. यापुढे तुम्हाला 7 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. यापूर्वी बँक ग्राहकांना 7.25 टक्के दराने व्याज देत होती.


कर्ज प्रक्रिया शुल्कही कमी केले


सोमवारी एका निवेदनात बँकेने म्हटले आहे की, व्याजदर कपातीव्यतिरिक्त, 30 जून 2022 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी कर्ज प्रक्रिया शुल्क 1,500 रुपये (जीएसटी वगळता) कमी केले आहे. या व्याजदराचा आणि सवलतीच्या प्रक्रिया शुल्काचा लाभ नवीन कार खरेदीवरच मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. हा व्याजदर ग्राहकाच्या 'क्रेडिट प्रोफाइल'शी जोडला जाईल. याबाबत माहिती देताना बँकेचे सरव्यवस्थापक एचटी सोलंकी म्हणाले, "कार कर्जावरील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात कपात केल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे वाहन खरेदी करणे आता अधिक परवडणारे होईल."


सेकंड हँड कारवर मिळणाऱ्या कर्जामध्ये कोणताही बदल झालेला नाही


दरम्यान, जुन्या म्हणजेच सेकंड हँड कार आणि दुचाकींच्या कर्जावरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर 6.75 वरून 6.50 टक्क्यांवर आणला आहे.


गृहकर्जही झाले स्वस्त 


बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाच्या दरातही कपात केली आहे. बँकेच्या ग्राहकांना 6.5 टक्के दराने गृहकर्ज मिळत आहे. यासोबतच तुम्हाला प्रोसेसिंग फीवर विशेष सवलतीचाही लाभ मिळेल.


महत्वाच्या बातम्या :