Whatsapp Account Banned: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp खूप लोकप्रिय आहे. वापरकर्त्यांचा अनुभव आणखी सुखद बनवण्यासाठी कंपनीनं नवीन फीचर्स जारी करण्याव्यतिरिक्त, अनेक खात्यांवर कारवाई देखील करत आहे. आता WhatsApp ने भारतात 18 लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत. व्हॉट्सअॅपने मार्च 2022 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात व्हॉट्सअॅपने 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान 18 लाखांहून अधिक खाती बॅन केल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीने केलेली ही कारवाई फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत सुमारे 8 लाख संख्येने अधिक आहे.


व्हॉट्सअॅपने फेब्रुवारी महिन्यात सुमारे दहा लाख खात्यांवर बंदी घातली होती. कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे की, IT नियम 2021 चे पालन करून हा अहवाल जारी करण्यात आला आहे. मार्च महिन्याचा अहवालही प्रसिद्ध झाला आहे. कंपनीने म्हटले आहे की, युजर्सची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे यूजर्सकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे कंपनीने या खात्यांवर कारवाई केली आहे. ही खाती हानिकारक कामात गुंतल्याने त्यांच्यावर व्हॉट्सअॅपने बंदी घातली असावी, असे बोलले जात आहे.


अॅपचे धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्यामुळे व्हॉट्सअॅपने या खात्यांवर बंदी घातली आहे. यामधील बऱ्याच अकाउंटला छळ करणे, चुकीची माहिती फॉरवर्ड करणे किंवा इतर वापरकर्त्यांच्या नावाने खाती वापरणे, या कारणावरून बंद करण्यात आली आहेत. जर तुम्हीही असा प्रकार करत असाल तर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंटही बॅन होऊ शकते. गेल्या 1 वर्षापासून कंपनीने बनावट माहितीचा प्रसार रोखण्यासाठी अनेक फीचर्स जारी केले आहेत.    


इतर महत्त्वाच्या बातम्या: