नवी दिल्ली: केंद्रात नरेंद्र मोदींचं कॅबिनेट विरुद्ध राहु गांधींचे शॅडो कॅबिनेट (Rahul Gandhi Shadow Cabinet) असा सामना रंगण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी शॅडो कॅबिनेट बनवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीची ताकद वाढली असून राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारवर वचक ठेवण्यासाठी राहुल गांधी नवी योजना बनवण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.
शॅडो कॅबिनेटला कोणताही घटनात्मक दर्जा नसतो. पण सरकारच्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी विरोधक एक टीम बनवू शकतात आणि त्यांना वेगवेगळ्या मंत्रालयाच्या कामकाजावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. अधिवेशनात मंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी या शॅडो कॅबिनेटचा वापर होऊ शकतो.
शॅडो कॅबिनेट म्हणजे काय? (What Is Shadow Cabinet)
शॅडो कॅबिनेट ही संकल्पना पहिल्यांदा ब्रिटनमध्ये वापरण्यात आली. संसदेत विरोधी सदस्य त्याचा वापर सरकारच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी करतात. शॅडो कॅबिनेट ही घटनात्मक व्यवस्था नाही. मात्र सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते एकत्र येऊन एक टीम बनवू शकतात आणि ती टीम वेगवेगळ्या मंत्रालयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आणि अधिवेशन काळात संबंधित मंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी पुढे करता येते.
ज्याला जी जबाबदारी मिळेल तो त्या विभागाशी संबंधित कामावर लक्ष ठेवेल आणि सरकारच्या उणिवा संसदेत मांडेल. यामध्ये कुणाला संरक्षण खात्याचे तर कुणाला वित्त, वाणिज्य, रेल्वे, आरोग्य खात्याचे शॅडो मिनिस्टर केले जाऊ शकते.
सन 1999 मध्ये, जेव्हा सोनिया गांधी विरोधी पक्षाच्या नेत्या बनल्या तेव्हा त्यांनी वाजपेयी सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी समित्या स्थापन केल्या. प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग आणि आनंद शर्मा यांसारख्या नेत्यांना वेगवेगळ्या मंत्रालयांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची आणि अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
राहुल गांधींच्या शॅडो कॅबिनेटमध्ये कोण-कोण नेते असतील?
- अखिलेश यादव
- अभिषेक बनर्जी
- केसी वेणुगोपाल
- दयानिधि मारन
- दीपेंद्र हुड्डा
- गौरव गोगोई
- मनिष तिवारी
- सुप्रिया सुळे
- मीसा भारती
- अमरिंदर सिंह राजा वडिंग
- संजय राऊत
- संजय सिंह
राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी
राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनणार हे आता निश्चित झालं आहे. यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते होण्यासाठी पक्षाकडे बहुमत नव्हते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी मोठी असते. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो आणि कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला दिल्या जाणाऱ्या सुविधा त्याला मिळतात. सरकारी कामासाठी स्वत:चे स्वतंत्र कार्यालय मिळते. यापूर्वी गांधी घराण्यातील राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजावली आहे.
विरोधी पक्षनेत्याची भूमिका काय?
- CBI, CEC, CVC, CIC चेअरमन निवडण्यात विरोधी पक्षाच्या नेत्याची भूमिका असते.
- मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची निवड करण्यात सहभागी होईल
- न्यायमूर्तींच्या नियुक्तीमध्ये विरोधी पक्षनेत्याचा सहभाग असतो
- संसदेच्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असते.
ही बातमी वाचा: