Tamil Nadu Assembly Session : तामिळनाडू विधानसभेतून (Tamil Nadu Assembly ) मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षाला संपूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यात आलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) पक्षाच्या सर्व 62 आमदारांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यात आलं आहे. विषारी मद्य प्रकरणी बुधवारी विधानसभेत मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. यानंतर तामिळनाडू विधानसभेने बुधवारी विरोधी पक्षनेते एडप्पादी के. पलानीस्वामी आणि AIADMK पक्षाच्या सर्व आमदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा ठराव मंजूर केला. हा निर्णय तामिळनाडूचे सभापती एम. अप्पावू यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. 


विरोधी पक्षाचे सर्वच्या सर्व 62 आमदार निलंबित


यापूर्वीही AIADMK सदस्यांना सभागृहाच्या कामात व्यत्यय आणल्यामुळे सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी झालेल्या सत्रात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, एक दिवसाच्या निलंबनानंतर AIADMK पक्षाच्या आमदारांनी काळे शर्ट परिधान करत बुधवारी सभागृहात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विषारी मद्य या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली.


तामिळनाडूत राजकारण पेटलं






नेमकं प्रकरण काय?


तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते ई.के. पलानीस्वामी यांच्यासह अखिल भारतीय अन्नाद्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) पक्षाच्या सर्व आमदारांना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल बुधवारी सभागृहाच्या चालू अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं आहे. AIADMK आमदारांचं त्याधी मंगळवारीही  दिवसभरासाठीही निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर AIADMK विरोधी पक्षाचे आमदार काळे शर्ट घालून आज सभागृहात पोहोचले आणि त्यांनी कल्लाकुरीची विषारी दारू प्रकरणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी तहकूब करण्याची मागणी केली, पण विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं की, ते या विषयावर निर्णय घेतील. 


AIADMK आमदारांची सभागृहात निदर्शने


ज्वलंत मुद्द्यावर लवकरात लवकर चर्चेचा आग्रह धरत AIADMK आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी करत निदर्शने केली. सभापतींनी अनेकवेळा विरोधी पक्षाच्या आंदोलक सदस्यांना जागेवर जाण्याची विनंती केल्यानंतरही सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला. यानंतर सभापतींनी त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. यानंतर सभागृहाने सध्याच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 29 जूनपर्यंत AIADMK आमदारांना उर्वरित कामकाजापासून निलंबित करण्याचा एकमताने ठराव मंजूर केला आहे.


अध्यक्षांंकडून सर्व आमदारांवर निलंबनाची कारवाई


AIADMK आमदारांनी प्रश्नोत्तरे सत्र तहकूब करण्याची मागणी केली होती आणि नुकत्याच झालेल्या कल्लाकुरी प्रकरणी घोषणाबाजी केली. त्यांच्या या कृतीमुळे विधानसभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे अध्यक्ष अप्पावू यांनी कठोर पावले उचलत त्यांचं निलंबन केलं आहे.