अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीची होता, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी दिली होती. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांनी (Rohit Pawar) सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत महायुतीवर निशाणा साधला होता. यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. 


विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला 


बारामतीमधून (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) रिंगणात उतरवण्यासाठी अजितदादांवर गुजरातमधील नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा असल्याचे ट्विट रोहित पवारांनी केले होते. यावर  रोहित पवारांनी असे वक्तव्य करणं थोडं थांबवलं पाहिजे. त्यांच्याकडून प्रत्येक वेळी अपरिपक्वतेचे विधान येतं असून ते स्वतःच हसू करून घेतात, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांना लगावला आहे. 


लाडकी बहीण योजनेची मविआत भीती


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बहि‍णींना भीती घालवण्यासाठी आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी या  योजनेवर टीका केली तर सुप्रिया सुळे यांनी योजनेचा पहिला हफ्ता बँकेत जमा झाला आहे तो सर्व बहिणींनी लवकर काढून घ्यावा नाहीतर भाजपचा एक नेता म्हणाला आहे की, पैसे परत घेतले जातील, असे म्हणत सरकारला डिवचले होते. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी मविआ नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मविआत भीती बसली आहे. लाडकी बहीण योजना आमच्या प्रत्येक बहिणीच्या मनात घर करून बसली आहे. या योजनेवरून कोणी कितीही टीका केली तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आमचे सरकार बांधील आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण 


दरम्यान, देशभरात आज 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अहमदनगर येथे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलिस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. विखे यांनी  आपल्या भाषणात देशात सरकारच्या वतीने राबवल्या जात असलेल्या योजना सांगितल्या आणि सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दलातील विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं.


आणखी वाचा 


Supriya Sule : रक्षाबंधनाला अजितदादांना राखी बांधणार का? सुप्रिया सुळेंनी एका शब्दात विषय संपवला