Pyare Khan on Nitesh Rane: नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांची प्रतिमा खराब करण्याच्या षड्यंत्राचा एक भाग असल्याचा धक्कदायक आरोप राज्य अल्पसंख्यांख आयोगाचे (Minority Department) अध्यक्ष प्यारे खान (Pyare Khan) यांनी केला आहे. नितेश राणे मुद्दाम देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेवून वारंवार विवादास्पसद वक्तव करत फिरतात. त्यामुळे फडणवीसांची प्रतिमा खराब होत आहे. नितेश राणे हे भारतीय मुसलमानाचा पाकिस्तानी मुसलमान असा उल्लेख करत आहे. बकरी ईदला घेवून देखील नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या संदर्भात आतापर्यंत राज्य अल्पसंख्याख आयोगाकडे नितेश राणे यांच्या विरोधात 40 तक्रारी आल्याचे देखील प्यारे खान म्हणाले. ते नागपूर येथे बोलत होते. 

Continues below advertisement


कायद्यात ज्या दिवशी वर्चुअल ईद साजरी करण्याचा कायदा येईल, त्यादिवशी वर्चूवल ईद सराजी केली जाईल. जो कायदा आहे त्यानुसार ईद साजरी केली जात आहे. गो हत्या बंदी आहे, तो कायदा आहे. त्याचे पालन व्हायलाच पाहिजे, असे मत देखील प्यारे खान यांनी व्यक्त केले.


नितेश राणे महाराष्ट्राला बरबाद करण्यामागे लागले आहेत: प्यारे खान 


नितेश राणे वारंवार देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन बोलतात. राणे महाराष्ट्राला बरबाद करण्यामागे लागले आहेत. भारतात राहणारे मुस्लिम इमानदारीने राहतात. पाकिस्तानमध्ये गेलेले बेईमान आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असल्याने त्याचे पालन व्हावे, असे आमचे मत आहे. बकरा बळी संदर्भात हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजावर अन्याय आहे. कारण बकऱ्यामुळे अनेकांना रोजगार मिळतात. देवेंद्र फडणवीस फक्त हिंदू समाजाचे मुख्यमंत्री नाहीत तर सर्व धर्माचे मुख्यमंत्री आहे. देवेंद्र फडणवीस सर्वाचे काम करतात. त्यांच्याबद्दल बोलण्याआधी आपली छबी तयार करण्याची गरज आहे. असेही प्यारे खान म्हणाले.    


....त्यामुळे नितेश राणेंचा नंबर लागण्याची शक्यता आहे: प्यारे खान


देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते नाहीत तर त्यांना जग ओळखतं. तुम्ही स्वतः च व्यक्तिगत मत मांडा, पण त्यामध्ये इतरांना समाविष्ट करू नये. नितेश राणेवर देवेंद्र फडणवीस यांचे संस्कार असते तर ते असे वागले नसते. मी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या संस्कारात घडलोय. राज्यात गोवंश कायदा असल्याने त्याच पालन करावे असे मत माझे नाही तर, कुराण इस्लाममध्ये उल्लेख आहे. काही चुकीचं होत असेल तर नितेश राणेंवर कारवाईची मागणी करणार असल्याचे ही प्यारे खान म्हणाले. भाजप ईमानदार सरकार आहे. इथे चुकीचं काही चालणार नाही. भाजप कधीच असे विचार किंवा काम करत नाही. जे वाकडं बोलतात त्यांना बाजूला करण्याचं काम भाजपने केले आहे. त्यामुळे नितेश राणेंचा नंबर लागण्याची शक्यता आहे. शिवाय मी नितेश राणे यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार असल्याचही प्यारे खान म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या