Punjab's Bhagwant Mann Cabinet Expansion Ceremony:  पंजाबमध्ये आज मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मान मंत्रिमंडळात एकूण 10 मंत्री सामील झाले आहेत. चंदीगडमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सर्व नेत्यांना मंत्री पदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर सर्व मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. अशातच पंजाबच्या या नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक दुपारी 2 वाजता होणार असून, त्यात सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. 


दुसऱ्यांदा आमदार झालेल्या दोनच नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान 


या 10 मंत्र्यांमध्ये आम आदमी पक्षाने दुसऱ्यांदा आमदार झालेल्या दोनच नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. चीमा आणि मीत हेअर हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर उर्वरित आठ आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. नामनिर्देशित मंत्र्यांपैकी पाच माळव्यातील, चार माझा आणि एक दोआबा येथील आहेत. तसेच नामनिर्देशित मंत्र्यांपैकी दोघे डॉक्टर आहेत. मंत्र्यांना देण्यात येणारी खाती अद्याप जाहीर झालेली नाहीत.


कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात मिळाले स्थान? 



  1. हरपाल चीमा (दिरबा)

  2. डॉ. बलजीत कौर (मलौट)

  3. हरभजन सिंग ईटीओ (जंदियाला)

  4. डॉ. विजय सिंगला (मानसा)

  5. लालचंद कटारुचक (भोआ)

  6. गुरमीत सिंग मित हेअर (बरनाला) भेटले

  7. कुलदीप सिंग धालीवाल (अजनाला)

  8. लालजीत सिंग भुल्लर (पट्टी)

  9. ब्रह्मा शंकर (होशियारपूर)

  10. हरज्योत सिंग बैंस (आनंदपूर साहिब)


महत्त्वाच्या इतर बातम्या :